घरमुंबईमध्य रेल्वेच्या ५०० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना मलेरियाची लागण

मध्य रेल्वेच्या ५०० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना मलेरियाची लागण

Subscribe

मध्य रेल्वेत स्वछता अभियान जोरात सुरू असताना रेल्वेच्या वसाहतीत राहणारे रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मच्छरांमुळे मलेरियाची लागण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे वसाहतीत रहाणारे 225 पेक्षा जास्त मध्य रेल्वे कर्मचारी मलेरियाग्रस्त झाले होते. हा आकडा फक्त रेल्वेच्या आरोग्य विभागाचा आहे. प्रत्यक्षात 500 पेक्षा जास्त कर्मचारी अणि त्यांच्या कुटुंबियांना मलेरियाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती रेल्वे कर्मचारी संघटनाकडून देण्यात आली आहे. या २२५ कर्मचार्‍यांवर भायखळा आणि कल्याण येथील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये इलाज करण्यात आले आहेत.

अस्वच्छता, साचणारे पाणी यामुळे मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. मध्य रेल्वेकडून नेहमीच रेल्वे स्थानकांवर स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो. आता तर मध्य रेल्वेच्या स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. त्या अंतर्गत रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते आहे. स्वच्छताविषयी कार्यक्रम राबवित जात आहेत. मात्र स्वत:ची रेल्वे वसाहत आणि रेल्वे कार्यालयाकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

- Advertisement -

यंदाच्या पावसाळयात मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांना त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यात 225 पेक्षा जास्त रेल्वे कर्मचार्‍यांना मलेरियाची लागण झाली आहे, असे रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रेल्वेच्या कर्मचार्‍यांना मलेरिया होऊ नये याची आम्ही काळजी घेतो, असेही तो अधिकारी म्हणाला. रेल्वेच्या कॉलनीमध्ये राहणारे कर्मचार्‍यांना मलेरिया आणि डेंग्यू झाल्यास बहुसंख्य रेल्वे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमध्ये न जाता. खासगी हॉस्पिटलात धाव घेतात. त्यामुळे हा आकडा 500 पेक्षा आधिक आहे, अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून देण्यात आली आहे.

नेहमीत दवाईची फवारनी होत नाही
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पूर्वी रेल्वे कर्मचार्‍यांच्या वसाहतीत पावसाळ्यात डासांची पैदास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय केले जायचे. नेहमी स्वच्छता व्हायची. मात्र काही वर्षांपूर्वी स्वच्छतेचे काम खासगी लोकांना देण्यात आले आहे. त्यांच्याकडून कामात हलगर्जीपणा होत असल्यामुळे रेल्वे वसाहतीत नेहमीच स्वच्छता असते. त्यामुळे कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुबियांना मलेरिया आणि डेंगू सारखे रोग होतात. या संबंधी अनेकदा तक्रारी करून सुध्दा मध्य रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. रेल्वे प्रशासनाने कामचूकार अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटणागर यांनी दिली.

- Advertisement -

पावसाळ्यात मलेरियाचे मच्छर होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून नेहमीत प्रयत्न केले जातात. मध्य रेल्वेच्या वसाहतींमध्ये पावसाळ्यात वेळोवेळी पाहणी करून आरोग्य विभागाकडून औषध फवारणी केली जाते. तसेच कर्मचार्‍यांना ते रहात असलेला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही केले जाते.
– ए.के. जैन ,वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -