घरक्राइमइन्स्टाग्रामवर इतर मुलींबरोबर चॅट; प्रेयसीने केले भांडण अन् पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल

इन्स्टाग्रामवर इतर मुलींबरोबर चॅट; प्रेयसीने केले भांडण अन् पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल

Subscribe

मुंबई : सध्याच्या काळात प्रेमात काही वाद झाला तर एकमेकांना सोडून प्रेमी-प्रेमिका आयुष्यात पुढे जातात. मात्र आजही अशी काही लोक आहेत, प्रेमातील विरह सहन होत नाही आणि ते टोकाचे पाऊल उचलतात. मुंबईच्या वरळीमध्येही अशीच एक धक्कादायक समोर आली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाले म्हणून पोलीस कॉन्स्टेबलनं गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले. धक्कादायक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेत असल्याचा फोटो प्रेयसीच्या मैत्रिणीला पाठल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Chat with other girls on Instagram The girlfriend quarreled and the police Indrajeet Salunkhe took extreme steps)

हेही वाचा – भंडाऱ्यातील अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल; दोन पोलीस कर्मचारी निलंबित

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत साळुंखे (वय 27) भोईवाडामध्ये सेवा बजावत होता आणि वरळी पोलीस वसाहतीत राहत होता. त्याचे गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत एप्रिल महिन्यापासून प्रेमप्रकरण सुरू होते. मृत कॉन्स्टेबल दुसऱ्या महिलेसोबत इन्स्टाग्रामवर बोलायचा त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. सोमवारी (20 नोव्हेंबर) संध्याकाळी 4 च्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वरळी सी-फेसजवळ भांडण झाले. त्यानंतर 6 च्या सुमारास मृत इंद्रजीतने प्रेयसीला दादर स्टेशन सोडले. यावेळी प्रेयसीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि त्यानंतर साडे सहाच्या सुमारास सोशल मीडियावरही ब्लॉक केले. ही गोष्ट पोलीस कॉन्स्टेबलला समजली. त्यामुळे नाराज झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलने रात्री 10 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.

हेही वाचा – मास्तर, हे बरं नव्हं : निलंबनाच्या रागातून प्राध्यापकांचा मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर हल्ला

- Advertisement -

पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या करण्यापूर्वी गळ्यात फास लटकवलेला फोटो प्रेयसीच्या मैत्रिणीला पाठवला. जेणेकरून प्रेयसीला कळू शकेल की, त्याने आत्महत्या केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस दलातील शस्त्रगार विभागात कार्यरत होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंद केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृत कॉन्स्टेबलच्या भावाचा जबाब नोंदवला आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या भावाने कुणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलीस याप्रकरणी एडीआर रिपोर्ट नोंदवून पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -