घरमुंबईकॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

Subscribe

दिल्लीत सायबर सेलची कारवाई; दोन भामट्यांना अटक व कोठडी

कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्लीतील दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी शहरातील एका नामांकित कंपनीच्या नावाने बेरोजगार तरुणांना नोकरीचे बोगस मेल पाठविले होते, मुंबईसह देशभरातील अनेक बेरोजगार तरुणांकडून विविध कारण सांगून या टोळीने घेतलेल्या लाखो रुपयांचा अपहार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ही एक आंतरराज्य टोळी असून दोन आरोपींच्या अटकेने या गुन्ह्यांत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

बिपीन राजपालसिंग यादव आणि मोहिद राकेशकुमार यादव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून पोलिसांनी एक ओपो कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचे 21 मोबाईल हॅण्डसेंटपैकी दोन हॅण्डसेंटमधील सिमकार्ड, एअरटेल आणि वाडोफोन कंपनीचे सीमकार्ड, एक राऊटर, मॉडेम, एअरटेल कंपनीचा राऊटर, संगणकातील दोन हार्डडिस्क, एक डिझीटल व्हिडीओ रेकॉर्डर सिस्टम आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे.

- Advertisement -

12 सप्टेंबर ते 6 डिसेंबर 2018 या कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातून गैरवापर करुन तसेच मोबाईलवरुन संपर्क साून मुंबईतील एका नामांकित बोलतोय असे सांगून त्यांना कंपनीत नोकरी लागली आहे असे बोगस ईम पाठविले होते. त्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन फी, जॉईनिंग फिसह इतर कारण सांगून त्यांना पैसे भरण्यास सांगून एका बँक खात्याचा अकाऊंट देण्यात आले होते. या अकाऊंटमध्ये पैसे जमा होताच संबंधित आरोपी पळून गेले होते. हा प्रकार नंतर अभिजीत रॉयसह इतर उमेदवार तरुणांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात संबंधित कॉल आणि मेल दिल्लीतील टागोरनगर, राजौरी गार्डन परिसरातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सायबर पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीला गेले होते. या पथकाने राजौडी गार्डन पोलिसांच्या मदतीने बिपीन यादव आणि मोहिद यादव या दोघांना अटक केली.

पोलीस तपासात या दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही रविवारी रात्री पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्यांना सोमवारी दुपारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात या टोळीने मुंबईसह देशभरातील विविध राज्यातील तरुणांना संबंधित नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले होते, त्यांना विविध कारण सांगून एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणूक करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -