घरमुंबईबोर्डाच्या चुकीच्या वेळापत्रकाचा शिक्षकांना फटका

बोर्डाच्या चुकीच्या वेळापत्रकाचा शिक्षकांना फटका

Subscribe

परीक्षा केंद्रांवर जा, कलचाचणी अहवाल द्या

दहावी-बारावीच्या परीक्षा, मुलांचे प्रक्टिकल, इतर वर्गाच्या तोंडी परीक्षा तसेच निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती यामुळे शाळेत शिकवायला मुले नाहीत, मुलांचे निकाल कोण लावणार? पेपर कोण तपासणार? असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर असताना कलचाचणी अहवाल बोर्डाकडून उशिराने जाहीर करण्यात येत आहे. त्याचा फटका शिक्षकांना बसणार आहे. कलचाचणीचा अहवाल परीक्षा केंद्रांवर जाऊन देण्याच्या सूचना बोर्डाने दिल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

शाळेत दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. मुलांचे प्रॅक्टिकल सुरू आहेत. इतर वर्गांच्या तोंडी परीक्षा सुरू आहेत. शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासायला आले आहेत. निवडणुकीचे कामही सुरू झाले आहे. शिक्षकांना ३० एप्रिलपर्यंत निवडणूक कामासाठी नियुक्त केले आहे. शिक्षक निवडणूक कामासाठी न गेल्यास त्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहेत. शाळेत मुलांना शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांचे निकाल कोण बनवणार? पेपर कोण तपासणार? असे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातच बोर्डाकडून कल चाचणीचा अहवाल 15 मार्चला शाळेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

शिक्षकांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपर संपल्यावर त्याचे वाटप करायचे आहे. अहवालाचे वाटप करताना मुलांच्या अभ्यासाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजीही घ्यावयाची आहे. २२ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करुन त्याचा अहवाल बोर्डाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डाने कल चाचणीचा अहवाल उशिरा लावण्यामुळे त्याचा फटका शिक्षकांना बसणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना असल्याचे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -