घरमुंबईजाणता राजाच्या वादात आला विष्णूचा अवतार; काय म्हणाले छगन भुजबळ

जाणता राजाच्या वादात आला विष्णूचा अवतार; काय म्हणाले छगन भुजबळ

Subscribe

बावनकुळे हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत.  त्यांनी हस्यास्पद व न पटणारी विधाने करू नयेत. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ८० हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. महाराष्ट्रात उद्योगधंदे आणले. राज्यासह देशाच्या विकासात शरद पवार यांनी योगदान दिले. म्हणून मी त्यांना जाणता राजा म्हणालो. याचा अर्थ मी त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करतो असा होत नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.

मुंबईः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरुन सुरु झालेला वाद संपण्याची काही चिन्हे दिसत नाही. तुम्ही मोदींना विष्णूचा आवतार म्हणता. त्यावेळी आम्ही काय म्हणालो? ठिक आहे. तुम्हाला ते विष्णूचे आवतार वाटतात तर म्हणा तुम्ही. आमचे काहीच म्हणणे नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मारला.

भुजबळ म्हणाले, बावनकुळे हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हस्यास्पद व न पटणारी विधाने करू नयेत. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ८० हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. महाराष्ट्रात उद्योगधंदे आणले. राज्यासह देशाच्या विकासात शरद पवार यांनी योगदान दिले. म्हणून मी त्यांना जाणता राजा म्हणालो. याचा अर्थ मी शरद पवार यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करतो असा होत नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

भुजबळ यांनी यावेळी बसवेश्वर, फुले व गांधी यांचीही आठवण करुन दिली. या तिघांना आपण महात्मा म्हणतो. त्यांनी चांगले काम केले म्हणून त्यांना ही उपाधी मिळाली आहे. महात्मा ही उपाधी भारतरत्न सारखी नसते. ती सरकार देत नाही. जनतेच्या भावनेतून अशी उपाधी दिले जाते. चांगले काम करणाऱ्यांना एखादे विश्लेषण दिले तर त्यात अडचण काय, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहात भाषण करताना संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता. यावरुन भाजपने राज्यभरात आंदोलन केले. त्यानंतर संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणायचे असेल तर त्यांनी म्हणावे व ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे असेल त्यांनी तसे म्हणावे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली व आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत, असे सांगितले. त्यावेळी अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. शरद पवार यांना जाणता राजा म्हटले जाते हे योग्य आहे का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. आम्ही कुठे म्हणतो शरद पवार यांना जाणता राजा म्हणा, असे उत्तर अजित पवार यांनी दिले होते. याबाबत छगन भुजबळ यांना गुरुवारी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार हे जाणता राजाच आहेत, असे उत्तर भुजबळांनी दिले. त्याला बावनकुळे यांनी प्रत्त्यूतर दिले. त्यावर भुजबळांनी टोला लगावला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -