घरमहाराष्ट्रतुकाराम मुंढेंच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव बारगळला!

तुकाराम मुंढेंच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव बारगळला!

Subscribe

तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला हा प्रस्ताव मागे घेतला असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नगरसेवक झुकले असल्याचं समोर आलं आहे.

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा विषय चर्चेत होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजपाच्या नगरसेवंकांनी मुंढेंविरोधातला हा अविश्वास प्रस्ताव मागे घेतला आहे. शनिवार १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेतील हा अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर भाजपा नगरसेवक नरमल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत हा अविश्वास प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव महापौर रंजना भानसी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तुकारम मुंढेंच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिलं होतं.

हेही वाचा : माझा कारभार पारदर्शक मग अविश्वास ठराव का?

मुंढेही एक पाऊल मागे

दरम्यान तुकाराम मुंडे यांनी देखील याप्रकरणात एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळते आहे. भाजप नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बॅकफूटवर जात, निवासी मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात ५० टक्के तर अनिवासी व व्यावसायिक मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात २५ टक्के कपातीची घोषणा केली आहे. दुसरीकडे मुंढे यांनी पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर कायम ठेवत, तो २० वरून ३ पैशांवर आणला आहे. त्यामुळे शेतीवरील करधाड कायम राहिली आहे. सोबतच मोकळ्या भूखंडावरील ३ पैसे कर कायम ठेवत, लेआउट आणि एनए झालेल्या प्लॉटवर मात्र २० पैसे कर केला आहे. त्यामुळे नागरिकांवरील करवाढीचे संकट कायम राहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  मुढेंविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांची एकी

तुकाराम मुंढे यांच्याविषयी थोडक्यात

मूळचे बीडचे असेलेले तुकाराम मुंढे २००५ सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नोकरीमध्ये आजवर अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुंढे यांच्या कामाची पद्धत स्थानिक राजकारण्यांना न पटल्याने त्यांच्या वारंवार बदल्या झाल्याचं बोललं जातं. २०१६ साली मुंढे यांनी नवी मुंबईचे आयुक्त पद भूषविले. पदभार स्विकारल्यानंतर अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेमुळे सर्वांची पाचावर धारण बसली होती. कामचुकारपणामुळे तब्बल ८०० कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून बडतर्फ करण्याचा त्यांचा निर्णय विशेष चर्चेत आला होता. मात्र, तिथूनही त्यांची बदली करून त्यांना पुण्यात पाठवण्यात आलं. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर त्यांची बदली नाशिकचे आयुक्त म्हणून करण्यात आल्याचं सांगितलं जातं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -