घरमुंबईछत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा; समारोप, पारितोषिक समारंभ

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा; समारोप, पारितोषिक समारंभ

Subscribe

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 जानेवारीपासून सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा समारोप 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मुंबई: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 जानेवारीपासून सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा समारोप 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याच दिवशी सायंकाळच्या सुमारास विजेत्यांना 53 लाखांची बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. या संदर्भातील माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports Mahakumbh Competition Conclusion Prize Ceremony)

यावेळी, महापालिका उपायुक्त (शिक्षण) रमाकांत बिरादार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ हे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे 26 जानेवारी 2024 पासून मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना, मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी मल्लखांब, मल्लयुद्ध, लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे, रस्सीखेच आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील ‘क्रीडा भारती मैदान’ येथे संपन्न होणार आहेत.

या स्पर्धेच्या सांगता सोहळ्याला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोड, ‘क्रीडा भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आणि इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. या सांगता सोहळ्यादरम्यान बुधवारी दुपारी 1 वाजता अंतिम सामन्यांना सुरुवात होईल. तर सामन्यांच्या नंतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत मुख्य समारंभ व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होईल. पुरस्कार वितरण समारंभानंतर सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार व गायक नंदेश उमप हे प्रेरणादायी पोवाडे सादर करणार आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Maratha Reservation: मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -