घरमुंबईवडार आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्री विसरले

वडार आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्री विसरले

Subscribe

19 ऑगस्टला मुंबईत अर्धनग्न हातोडी आंदोलन

दादा इदाते समितीने वडारांच्या मुलभूत न्याय हक्काच्या शिफारशी केल्या आहेत. त्या समितीचा अहवालानुसार पुढील कारवाई करण्याचेही म्हटले होते. तसेच दादा इदाते आयोगाच्या अहवालाचा अभ्यास निती आयोग करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानुसार वडार समाजाला एस.टी.प्रर्वगात समाविष्ट करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले होते. निवडणुकीचा बिगुल वाजून आता केव्हाही आचारसंहिता लागू शकते. म्हणून सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी अर्धनग्न हातोडी आंदोलन करून सरकारला जागे करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले जाणार आहे, असे वडार नेते डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी सांगितले.

वडार समाजाला आरक्षण द्यायला मुख्यमंत्री विसरले आहेत. त्यामुळे वडार समाज आता मैदानात उतरणार आहे. येत्या 19 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात अर्धनग्न हातोडी आंदोलन छेडून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सोलापूर येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वडार समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासोबतच इतर दहा घोषणा केल्या होत्या. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे, असा आरोप वडार नेते डॉ. रॅपनवाड यांनी पालघर येथे बोलताना केला. त्यामुळे वडार आरक्षणाच्या मुद्द्याचे स्मरण करून देण्यासाठीच आझाद मैदान येथे अर्धनग्न हातोडी आंदोलन करणार आहेत, असे रॅपनवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

रोजगाराच्या संधी,आर्थिक विकास विशेष महामंडळाची निर्मिती,पंढरपुरच्या विठठल मंदिर समितीत सदस्य पद,वडार जमातीतील वस्त्यांच्या जागा नावे करून मालकी हक्क, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, सोसायटींसाठी दहा टक्के कामे आरक्षित, वसंतराव महामंडळा अंतर्गत स्वतंत्र सप्लीमेंट्री महामंडळाची उभारणी, जमातीतील बेघरांसाठी घरे देणार,विविध जिल्ह्यात तालुक्यात बजरंगबली मंदिरांची उभारणी आदी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या मेळाव्यात बोलताना दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -