घरमहाराष्ट्रराष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

Subscribe

प्रत्येक भारतीय नागरिकाने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा यासाठी हिंदू जनजागृती समितीने तहसीलदार कल्पना गोडे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी भारतीय नागरिक मोठ्या अभिमानाने कागदी, प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज मिरवत असतात. परंतु त्याच दिवशी सायंकाळी हे राष्ट्रध्वज रस्त्यावर, कचर्‍यात, गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे छोटे राष्ट्रध्वज लगेच नष्ट होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. ही विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती गेल्या १६ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे.

याचाच एक भाग म्हणून समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही (१०३/२०११) दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय व राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी या विषयीचे परिपत्रक काढले. त्या अनुषंगाने राष्ट्रध्वजाचा प्रत्येक नागरिकाने सन्मान राखण्यासाठी समिती जनजागृती अभियान राबवित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -