घरटेक-वेक7,000mAh बॅटरीसह लाँच होणार Samsung Galaxy M51

7,000mAh बॅटरीसह लाँच होणार Samsung Galaxy M51

Subscribe

दक्षिण कोरियाची तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग एक नवीन स्मार्टफोन Galaxy M51 बाजारात आणण्याच्या विचारात आहे. या फोनची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी. रिपोर्ट्सनुसार या फोनला 7000mAh बॅटरी देण्यात येणार आहे. 7000mAh बॅटरी सध्या केवळ निवडक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M51 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर देण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे सॅमसंगच्या बर्‍याच स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, परंतु 7,000 एमएएच बॅटरी सध्या केवळ निवडक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. लिक झालेल्या माहितीनुसार Galaxy M51 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात येणार आहे. याशिवाय या फोनमध्ये 25W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

या स्मार्टफोनचा प्राथमिक कॅमेरा 64MP चा असेल. फोनमध्ये 8GB रॅम देण्यात येणार आहे. कंपनी हा फोन फक्त भारतात प्रथम लाँच करू शकते. गॅलेक्सी एम मालिका इथल्या बाजारामध्ये खूप लोकप्रिय असल्याने कंपनीला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. सध्या, कंपनीकडून या स्मार्टफोनबद्दल अधिकृत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अशी शक्यता आहे की येत्या काळात कंपनी आपले टीझर रिलीज करेल.


हेही वाचा – भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक खेळाडू अडकणार लग्नबंधनात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -