घरमुंबईसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Subscribe

मुंबई महापालिकेने कचऱ्याचे आणि साफसफाईचे काम कंत्राटदारांकडे दिल्या काराणाने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

मुंबईच्या कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये साफसफाई कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कामगारांनी थेट आर. दक्षिण पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मुंबई महापालिकेने कचऱ्याचे आणि साफसफाईचे काम कंत्राटदारांकडे दिल्या काराणाने हे आंदोलन करण्यात आले आहे. साफसफाईचे काम कंत्राटदारांना दिल्यामुळे बऱ्याच हंगामी सफाई कामगरांना घरी बसावे लागणार आहे, त्यामुले सफाई कामगारांनी हे आंदोलन पुकारले आहे.

हेही वाचा – सफाई कामगार करतात पोस्टमॉर्टम

- Advertisement -

शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ

मुंबईतील कचरा कमी झाल्याचे सांगत पालिकेने कचरा उचलणाऱ्या गाड्या कमी केल्या आहेत. परंतु, मुंबईत अद्यापही बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. असे असताना कचऱ्याचे आणि साफसफाईची कामे कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही कामे कंत्राटदाराकडून करून घेतली जाणार असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नियमित आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी समायोजन करण्यात येणार असले तरी हंगामी कर्मचाृऱ्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात आज सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला.


हेही वाचा – सफाई कामगारांची पालिकेकडून उपेक्षा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -