घरमहाराष्ट्रसज्जनगडावरुन प्रेमीयुगुलांची आत्महत्या

सज्जनगडावरुन प्रेमीयुगुलांची आत्महत्या

Subscribe

साताऱ्याच्या सज्जनगडावरुन प्रेमीयुगुलांनी आज दुपारी दरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघे ही मूळचे साताऱ्याचे असून मुंबईत राहत होते.

साताऱ्यामध्ये प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साताऱ्याच्या सज्जनगडावरुन उडी मारुन पूनम मोरे आणि निलेश मोरे या प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली आहे. पूनमने तिच्या चार वर्षाच्या मुलाला दगडावर बसवले त्यानंतर दोघांनी दरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. केली. दोघे जण ही मुंबईचे आहेत. दोघांचे मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आले असून सातारा जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पूनम मुंबईतून बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सज्जनगडावर असल्याचं कळालं होतं.

गेल्या काही दिवसापासून बेपत्ता

नीलेश मोरे आणि पुनम मोरे पाटण तालुक्यातील बोरकेवाडी येथील असून एकाच भावकितील होते. दोघांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रेम होते. मात्र पुनमचे काही वर्षापूर्वी एका तरुणासोबत लग्न झाले होते. पुनम लग्नानंतर मुंबईमध्ये पतीसोबत राहत होती. पुनमला चार वर्षाचा मुलगा आहे. तर निलेश देखील कामानिमित्त मुंबईमध्ये राहत होता. पुनम गेल्या काही दिवसापासून मुंबईतून बेपत्ता होती. तिच्या पतीने ती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार पोलीस पुनमचा शोध घेत होते.

- Advertisement -

दरीमध्ये उडी मारुन आत्महत्या

मुंबई पोलिसांनी पुनमचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर पुनम साताऱ्यातल्या सज्जनगड येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी आणि तिच्या पतीने सज्जनगडावर धाव घेण्यापूर्वीच पूनम आणि तिचा प्रियकर निलेशने गडावरुन दरीत उडी मारली होती. सज्जनगडावर आलेल्या पर्यटकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असताना त्याठिकाणी पुनमचा मुलगा दगडावर बसलेला सापडला. पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांकडून यासर्व प्रकरणाचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -