घरमुंबईराणी बागेचे बंद दरवाजे सरकारी परवानगीच्या प्रतीक्षेत

राणी बागेचे बंद दरवाजे सरकारी परवानगीच्या प्रतीक्षेत

Subscribe

राज्य सरकारच्या परवानगीने मुंबईतील नॅशनल पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पर्यटकांना आणि मुंबईकरांना राणी बाग कधी सुरू होणार याची ओढ लागली आहे.

मुंबईत कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ मध्ये राज्य सरकार हळूहळू शिथिलता आणत आहे. सरकारने, बेस्ट बस वाहतूक, मंदिर दर्शन, उद्याने, जिम, रेल्वे प्रवास आदी टप्प्या टप्प्याने सुरू केले आहेत. मात्र राणीची बाग व तेथील प्राणी संग्रहालयाचे बंद दरवाजे आणि येथे उपस्थिती दर्शविणारे पर्यटक हे सरकारी परवानगीच्या प्रतिकक्षेत आहेत.

राणी बाग व्यवस्थापनाला फक्त सरकारी परवानगीची गरज आहे. या अधिकृत परवानगीचा सिग्नल मिळताच राणीच्या बागेचे दरवाजे सर्वसामान्यांना तात्काळ उघडे होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या महसुली उत्पन्नाची वाटही खुली होणार आहे. मुंबईकरांना, पर्यटकांना सततच्या धावपळीमधून क्षणभर विश्रांती मिळणार असून पक्षी, प्राण्यांचे दर्शन घडणार असून गेले काही महिने नजरेआड झालेल्या माणसांना पक्षी,प्राणी यांना पाहता येणार आहे. एवढेच नव्हे तर पर्यटकांना मुंबईत ५३ एकर क्षेत्रात पसरलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. अर्थात कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करूनच ही पर्यटन यात्रा करता येणे शक्य होऊ शकते. राज्य सरकारच्या परवानगीने मुंबईतील नॅशनल पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पर्यटकांना आणि मुंबईकरांना राणी बाग कधी सुरू होणार याची ओढ लागली आहे.

- Advertisement -

याबाबत राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी, आमची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र सरकार व पालिका प्रशासनाने परवानगी दिली तर उद्याच राणी बागेचे बंद दरवाजे उघडले जाऊ शकतात. पूर्वीप्रमाणे २० हजार लोकांना एका दिवसांत राणी बागेत प्रवेश देता येणार नाही. मुंबईतून अद्यापही कोरोना हद्दपार झालेला नाही. प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

कोरोना लॉकडाऊनच्या आधी राणीबागेत दररोज १५ ते २० हजार पर्यंटक भेट देत असत. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवसांत हा आकडा काहीसा वाढत असतो, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. सेंट्रल झू अँर्थोरेटीने देशभरातील प्राणीसंग्रहालय सुरु करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. त्यानुसारच नॅशनल पार्क सुरू करण्यात आले असून त्यामुळे राज्य सरकारने परवानगी दिल्यास राणीची बाग पर्यटकांसाठी तात्काळ सुरू करण्यात येईल, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राणीच्या बागेत सध्या ‘शक्ती’ आणि ‘ करिष्मा’ या जोडगळीत कोरोनाच्या कालावधीत ‘युगुलगीत’ सुरू आहे. त्यामुळे लवकरच राणीच्या बागेत नवीन पाहुणे दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राणीच्या बागेचे सध्या आधुनिकीकरण सुरू आहे. याअंतर्गत औरंगाबाद येथून राणीच्या बागेत वाघ व वाघीण यांची जोडी आणण्यात आली आहे. ही जोडी कोरोना कालावधीत दोन – तीन वेळा एकमेकांच्या संपर्कात आलेली आहे. मात्र अद्याप त्यांचा अंदाज येत नाही. मात्र लवकरच या जोडीकडून नवीन पाहुण्याची अपेक्षा असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.


हेही वाचा – बेस्टची बैठक तहकूब, प्रशासनाकडून समिती अध्यक्षांसह सदस्यांचा अवमान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -