घरमुंबईअकरावी प्रवेशाचा श्रीगणेशा लवकरच

अकरावी प्रवेशाचा श्रीगणेशा लवकरच

Subscribe

सोमवारी जाहीर होणार कॉलेज व कट ऑफ यादी

दहावीचा निकाल घसरलेल्या विद्यार्थी व पालक चिंतेत असतानाच प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती शिक्षण मंडळाकडून जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तब्बल 1 लाख 78 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र उपशिक्षण संचालनालयाकडून कॉलेज व कट ऑफची यादी जाहीर न झाल्याने प्रवेशाच्या दुसर्‍या टप्पा रखडल्याने विद्यार्थी चिंतेत पडले होते. परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून 17 जूनला विद्यार्थ्यांना कॉलेज व कट ऑफची यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अकरावीसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दहावीचा निकाल घसरल्याने नामांकित कॉलेजमध्ये एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग धुसर झाला होता. त्यामुळे सीबीएसई व आयसीएसई विद्यार्थ्यांच्या लेखी गुणांवर त्यांच्या कॉलेज प्रवेश करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवेशासंदर्भात आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रियेला शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सुरुवात करण्यात आल्याने आतापर्यंत तब्बल 1 लाख 78 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पहिला टप्प्यातील नोंदणी करण्यात येत असताना प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या तिढ्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेशाबाबत कोणत्याही सूचना जाहीर करण्यात येत नव्हत्या. त्याचप्रमाणे कॉलेजांची यादी व गतवर्षाची कट ऑफ यादीही जाहीर करण्यात येत नव्हती.

- Advertisement -

त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जवळपास कोणती कॉलेज आहेत. नामांकित कॉलेज कोठे आहेत, त्यांची कट ऑफ काय आहे, आपल्याला कोणत्या कॉलेजला व कोणत्या शाखेला प्रवेश मिळू शकतो याचा अंदाज घेणे अवघड झाले होते. त्यामुळे कॉलेजांची यादी व कट ऑफ जाहीर करावी यासाठी विद्यार्थी व पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेर्‍या मारत आहेत. परंतु त्यांना काहीही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने त्यांची निराशा होत होती. परंतु आता विद्यार्थी व पालकांची ही प्रतीक्षा संपणार असून, 17 जूनला शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या मुंबई प्राधिकरणाच्या हद्दीतील कॉलेजांची यादी व त्यांची कट ऑफ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून सांगण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळपासचे कॉलेज व त्या कॉलेजमधील विविध शाखांची कट ऑफ मिळण्यास मदत होणार असल्याने अकरावीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -