घरमुंबईपॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन मोहीम

पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन मोहीम

Subscribe

पॉलिटेक्निक प्रवेशाची संधी, अभ्यासक्रम, जागा आदी माहितीसाठी विद्यार्थी व पालकांशी थेट संवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक विनोद मोहितकर यांनी कार्यक्रमाला प्रारंभ केला. राज्यातील सर्व अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबविणार्‍या तंत्रनिकेतनामध्ये लाईव्ह बॉडकास्टद्वारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून वेबलिंक आणि फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील १९ हजार ६८१ विद्यार्थी व पालकांनी यामध्ये भाग घेतला. त्याचबरोबर डिजीआयपीआर, एमएसईबीटी आदी फेसबुक पेजवरही सुमारे ७ हजारहून अधिक जणांनी सहभागी होत याला प्रतिसाद दिला.

देशात जीडीपी वाढविण्यासाठी औद्योगिक क्रांतीची आवश्कता व त्यासाठी लागणारा कुशल मनुष्यबळ पदविका अभ्यासक्रमामार्फत उपलब्ध करुन देशाच्या तसेच राज्याच्या विकासासाठी हातभार लावण्याची गरच असल्याचे मत डॉ.अभय वाघ यांनी व्यक्त केले. त्यामुळे दहावी आणि बारावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका प्रवेशासाटी डीटीई पोर्टलवर नोंदणी करावी आणि प्रवेश घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. तर संचालक मोहितकर यांनी तंत्रशिक्षण मंडळामार्फत रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केले जाणार प्रयत्न तसेच पदविका अभ्यासक्रमाचे महत्व त्याची उपयोगिता यांची माहिती दिली. या कार्यक्रमात अभियांत्रिकी क्षेत्रातील चेतन रायकर, आर. ए. पांचाळ, गिरीष दंडीगे, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील डॉ. नरेशकुमार हराळे, राजेश लिमये, विनायक ठकार आदींनी विद्यार्थी व पालकांना थेट संवाद साधत त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -