घरमुंबईonline education साठी शुल्क भरण्याचा कॉलेजांचा विद्यार्थ्यांवर दबाव

online education साठी शुल्क भरण्याचा कॉलेजांचा विद्यार्थ्यांवर दबाव

Subscribe

शुल्क न भरल्यास ऑनलाईन शिक्षणाची लिंक पाठवण्यात येणार नसल्याची धमकी विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या दोन्ही कॉलेजांविरोधात कारवाई करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

मुंबईतील अस्मिता कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या कॉलेजांनी वार्षिक शुल्कात वाढ करण्याबरोबरच ते एक रकमी भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. तसेच शुल्क न भरल्यास ऑनलाईन शिक्षणाची लिंक पाठवण्यात येणार नसल्याची धमकी विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या दोन्ही कॉलेजांविरोधात कारवाई करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कॉलेजाने वार्षिक शुल्कात वाढ करू नये व विद्यार्थ्यांना सुलभ हप्त्यामध्ये शुल्क भरण्यास सवलत द्यावी, असे निर्देश मुंबई विद्यापीठाने दिले आहेत. असे असतानाही अस्मिता कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तसेच राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण वार्षिक शुल्क एक रकमी भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच या कॉलेजांनी ऑनलाईन शिक्षण सुरू करून विद्यार्थ्यांना सर्व शुल्क एकरकमी भरा अथवा ऑनलाईन शिक्षणाची लिंक पाठवणार नाही, अशी धमकी देत त्यांना वेठीस धरले आहे. कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी व पालक आर्थिकदृष्ट्या हवालदिल झालेले असताना कॉलेजांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या नोटीस बेकायदेशीर आहेत. तरी कॉलेजांवर त्वरित कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -