घरCORONA UPDATECorona Virus : चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख पार

Corona Virus : चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख पार

Subscribe

देशात कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता दररोज ३५ हजारांहून अधिक रूग्णांची वाढ देशात होत आहे. देशात आतापर्यंत १२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. तर रिकव्हरी रेट ६३ टक्के इतका झाला आहे. covid19india.org मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आता १२ लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी सकाळपर्यंत ११ लाख ९२ हजार ९१५ इतकी होती. एकीकडे २८ हजार ७३२ जणांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ७ लाख ५३ हजार ०५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

मात्र सायंकाळपर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाखांहून अधिक झाला आहे. त्याची अधिकृत आकडेवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरूवारी सकाळी जारी करण्यात येईल. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट ६३.१३ टक्के झाली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार ५७६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ३७ हजार ६०७ जण कोरोनाबाधित झाल्याचे समोर येत आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ५५२ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोना व्हायरससंदर्भात भारताने वेळीच योग्य ती पावले उचलली – WHO

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -