घरमुंबईमुंबईत अवयवदानाची 'साठी' पूर्ण!

मुंबईत अवयवदानाची ‘साठी’ पूर्ण!

Subscribe

राज्य सरकारकडून अवयवदानाबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे २०१८-१९ या वर्षात अवयवदानाने सप्टेंबर महिन्यातच साठी गाठली. एका मेंदू मृत व्यक्तीच्या अवयवदानामुळे आठ जणांचे प्राण वाचू शकतात. अशा पद्धतीने केलेल्या जागरूकतेमुळे आता लोक स्वतःहून पुढाकार घेत अवयवदान करत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेमध्ये २०१९ या चालू वर्षात झालेल्या अवयवदानाच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ६० वे अवयवदान करण्यात आले आहे. मुंबईतील एका २५ वर्षीय तरुणाने अवयवदान करून चौघांना जीवदान दिले आहे. या तरुणाचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले आहे. तर, गेल्या चार दिवसांत मुंबईत दोन मेंदू मृत झालेल्या व्यक्तींनी अवयवदान केले आहे. या अवयवदानामुळे पाच गरजूंचे प्राण वाचू शकले आहेत.

आपल्या मुलाच्या अवयवांमुळे अन्य व्यक्तीचे प्राण वाचतील या भावनेतून कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरला ही अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. तर, दुसरीकडे मुंबईतील ३३ वर्षीय व्यक्तीने अवयवदान केले. या व्यक्तीचे यकृत दान करण्यात आले आहे. तर, मूत्रपिंड दान करण्यात आले असून काही अडचणींमुळे ते निकामी झाल्याने प्रत्यारोपण करता आले नाही. हे मुंबईतील ५९ वे अवयवदान ठरले आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवयवदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अवयवदानात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. मुंबई आणि ठाण्यात यंदा सर्वात जास्त अवयवदान झालं आहे. जनजागृतीमुळे हे शक्य झालं आहे.
– डॉ. एस. के. माथूर, अध्यक्ष, अवयव प्रत्यारोपण समिती, मुंबई विभाग

मुंबईत सप्टेंबर महिन्यातील हे पाचवे अवयवदान होते. २१ सप्टेंबर रोजी २५ वर्षीय तरुणाचे हृदय, दोन्ही मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले, तर १७ सप्टेंबर रोजी ३३ वर्षीय व्यक्तीचं यकृत दान करण्यात आले. २०१८ साली मुंबईत ४८ अवयवदान झाले होते. पण, २०१९ या वर्षी नऊ महिन्यांतच अवयवदानाचा हा आकडा पार करत चक्क ‘साठी’ गाठली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -