घरमुंबईकन्फर्मतिकीटने १० लाख बुकिंगचा टप्पा केला पार

कन्फर्मतिकीटने १० लाख बुकिंगचा टप्पा केला पार

Subscribe

ऑनलाइन रेल्वे तिकीट शोध आणि बुकिंग इंजिन, कन्फर्मतिकीटने आपल्या यशस्वी मार्गातील महत्त्वाचा टप्पा म्हणून १० लाख वार्षिक बुकिंग पूर्ण होण्याची घोषणा केली आहे, ज्याचे वर्षातील मूल्य १०० कोटी बुकिंग इतके आहे. एकूण बुकिंग नोंदीपैकी अनुक्रमे १५.५९१ टक्के आणि ११.८८६ टक्के बुकिंगसह महाराष्ट्र आणि दिल्लीने कन्फर्मतिकीट अ‍ॅपचा वापर करणार्‍या राज्यांच्या यादीत वरचा क्रमांक पटकावला आहे. उत्तर प्रदेश, तेलंगाना, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडुमधूनही मोठ्या प्रमाणावर बुकिंग झालेली आहे.

कन्फम र्तिकीटने मार्च २०१८ मध्ये ट्रेन बुकिंग सुविधा सुरू केली होती आणि शुभारंभाच्या पहिल्याच वर्षात १ दशलक्ष बुकिंग्जचा टप्पा पार केला आहे. ही संख्या २०१९ च्या अखेरपर्यंत ४ दशलक्ष पर्यंत पोहचेल अशी अपेक्षा आहे. कन्फर्म तिकीटचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कुमार कोठा म्हणाले, एप्रिल २०१९ पर्यंत मंचावर झालेल्या ७ दशलक्षांहून अधिक डाउनलोड आणि 3 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्त्यांसह आम्ही मागील दोन वर्षांमध्ये उत्कृष्ट वृद्धी नोंदवली आहे. आम्ही सुमारे ४.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूलाच्या निव्वळ कमाईसह १०० कोटी रुपयांची विक्री केली आहे. कन्फर्म तिकीटने यशस्वीरित्या वापरकर्त्यांचा विश्वास मिळवत उद्योगात आपले स्थान बळकट केले असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते. आम्ही वापरकर्ता संख्या आणि तिकिट बुकिंग्जमध्ये मजबूत वाढीसह २०२० पर्यंत ४०० कोटी रुपयांच्या विक्रीचे आणि १८-२० कोटी रुपयांच्या महसूली उत्पन्नाचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -