घरमुंबई२६/११: संजय निरुपमांना शहिदांचा विसर; गजेंद्र सिंग यांना वगळले

२६/११: संजय निरुपमांना शहिदांचा विसर; गजेंद्र सिंग यांना वगळले

Subscribe

मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावलेल्या बॅनरमुळे सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २६/११ च्या त्या भ्याड हल्ल्यात पोलीस आणि जवान मिळून १८ जणांना वीरमरण आले होते. मात्र संजय निरुपम यांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक मोठा बॅनर लावला आहे, ज्यामध्ये त्यांनी फक्त १७ जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. निरुपम यांच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर हे बॅनर लावण्यात आलेले आहे. यामध्ये ‘एनएसजी’ चे कमांडो हवालदार गजेंद्र सिंग यांचा फोटो वगळण्यात आले आहे.

martyrs of 26-11
हे आहेत २६/११ चे १८ शहीद जवान

२६/११ मुंबई हल्ल्याचा सविस्तर घटनाक्रम

कोण होते शहीद गजेंद्र सिंग

हवालदार गजेंद्र सिंग हे राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान होते. २००८ साली दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. कुलाबा परिसरातल्या नरिमन हाऊस (छाबड हाऊस) वर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे एक पथक पोहोचले या पथकात गजेंद्र सिंग यांचा समावेश होता. ऑपरेशन ‘ब्लॅक टरनाडो’ असे या मोहिमेचे नाव होते. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले पण तरीही त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार चालूच ठेवला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना अशोक चक्र हे मानाचे पदक देऊन गौरविण्यात आले होते. गजेंद्र सिंग शहिद झाल्यावर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सिंग यांच्या पत्नी विनिता सिंग यांचा गौरव केला होता. सिंग यांना एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गजेंद्र सिंग यांची मुलगी प्रीती सिंग ही मोठी झाल्यावर सैन्यदलात भरती होणार असल्याचे सांगते. विशेष म्हणजे गजेंद्र सिंग शहीद झाल्याने त्यांची पत्नी विनिता आणि मुलांनी मिळून त्यांचे घरातच स्मारक उभारले आहे. देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून ते या स्मारकाला वंदन करतात.

- Advertisement -
Shahid Gajendra singh of 26/11
२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले गजेंद्र सिंग यांचे घरातले स्मारक

असा आहे निरुपमांचा बॅनर

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी लावलेल्या बॅनरवर अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर, मेजर संदीप उनिकृष्णन, तुकाराम ओंबळे यांच्यासहित इतर शहिदांचे फोटो आहेत. पण या फोटोपैकी कोणाच्याही फोटोखाली नाव देण्यात आलेले नाही. या हल्ल्यात एकूण १८ जवान शहीद झाले होते. पण बॅनरवर फक्त १७ जणांच्या फोटोचा समावेश आहे. कमांडो गंजेंद्र सिंग यांना या फोटोमधून वगळण्यात आले आल्याने संजय निरुपम यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या एका सैनिकाचा विसर पडला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूलाच असणाऱ्या त्यांच्या कार्यालयाजवळ हा बॅनर लावण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -