घरदेश-विदेशजेव्हा एक 'रोबोट' गाणं गाते; पाहा Video

जेव्हा एक ‘रोबोट’ गाणं गाते; पाहा Video

Subscribe

इतकंच नाही तर शोदरम्यान सोफियाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर देत, तिने प्रेक्षकांना चकीत करुन सोडले. 

‘रोबोट’ला अनेकदा माणसांचा मित्र म्हटलं गेलं आहे. आजवर जगभरातील अनेक कंपन्यांनी विवध प्रकारची कामं करणारे रोबोट्स बनवले आहेत. भविष्यात माणसांची जागा घेऊ शकतील अशा अत्याधुनिक रोबोट्सची निर्मिती शास्त्रज्ञांकडून केली जात आहे. असाच एक भन्नाट रोबोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ‘सोफिया’ असं या रोबोटचं नाव असून, तिने चक्क एखाद्या माणसाप्रमाणे गाणं गायलं आहे. जिमी फॉलनने होस्ट केलेल्या ‘द टुनाईट शो जिमी फॉलन’ या न्यूयॉर्कमधील टीव्ही शोमध्ये, सोफियाने एका प्रसिद्ध अभिन्यासोबत गाणं गायलं आहे. हे गाणं पाहिल्यावर तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. यावेळी सोफियाने ‘से समथिंग’ हे रोमँटिक गाणं गायलं आणि उपस्थित लोक अंचबित होऊन गेले. सोफियाने गायलेल्या गाण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जगभरातील लोक व्हिडिओला चांगलीच पसंती देत आहेत. इतकंच नाही तर नेटिझन्स सोफिया रोबोटचं आणि तिची निर्मीत करणाऱ्यांचही भरभरुन कौतुक करत आहेत. इतकंच नाही तर शोदरम्यान सोफियाला एका क्विझदरम्यान काही जनरल नॉलेजचे प्रश्नही विचारण्यात आले. सोफियाने त्या प्रश्नांची अगदी अचूक उत्तर देऊन प्रश्न विचारणाऱ्यांना आणि प्रेक्षकांना चकीत करुन सोडले.

हाँगकाँगस्थित हॅनसन रोबॉटिक्सने ‘सोफिया’ रोबोटची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे एखाद्या देशाचं पूर्ण नागरिकत्व मिळवणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली मानवीय रोबो ठरली आहे.

- Advertisement -

‘सोफिया’.. वृद्ध व्यक्तींचा आधार

सोफियाचे निर्माते डेव्हिड हॅनसन सांगतात की सोफिया हुबेहुब एखाद्या माणसासारखी आहे. ती माणसांसारखं बोलते, वागते आणि विशेष म्हणजे आपल्या भावनाही व्यक्त करते. ‘वयोवृद्धांची एक मदतनीस’ या संकल्पनेतून डेव्हिड यांनी सोफियाची निर्मिती केली असल्याचं ते सांगतात. डेव्हिड सांगतात, की सोफियाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं ती अगदी मनापासून देते. यासाठी तिली कुणीही पढवलेलं किंवा शिकवलेलं नाही. तिच्यामध्ये बसवण्यात आलेल्या प्रोग्रामच्या मदतीने ती आजूबाजूच्या एकंदर परिस्थितीचा अंदाज घेते आणि त्यानुसार तिला त्यावेळी जे योग्य वाटेल तेच बोलते. सोफिया माणसंप्रमाणेच इंटरनेवर जाऊन सर्फिंग करते आणि सध्या जगात काय सुरु आहे, कोणत्या बातम्या येत आहेत, काय घडामोडी सुरु आहेत या सगळ्याची माहिती घेते. मात्र, सोफियाने गाणं गाण्याची ही पहिलीच वेळ होती. शोमधील वृध्दांसोबत तिने खूप आनंदाने गाणं गायलं. तिच्या या नव्या प्रयोगामुळे मी खूप खुष असल्याचंही डेव्हिड सांगतात.


वाचा: ‘या’ रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबोट आहेत वेटर

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -