घरमुंबई'आधी सुस्थितीत रस्ते द्या; मगच दंड आकारा', काँग्रेसचा ठाणे आरटीओवर मोर्चा

‘आधी सुस्थितीत रस्ते द्या; मगच दंड आकारा’, काँग्रेसचा ठाणे आरटीओवर मोर्चा

Subscribe

मोटार वाहन कायद्यातील जाचक दंड रद्द करा, आधी सुस्थितीत रस्ते द्या, मगच दंड आकारा, अशा घोषणा देत काँग्रेसने ठाणे आरटीओवर मोर्चा काढला.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मोटार वाहन कायद्यातील अन्यायकारक तरतूदींविरोधात काँग्रेसने सोमवारी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला. मोटार वाहन कायद्यातील जाचक दंड रद्द करा, आधी सुस्थितीत रस्ते द्या, मगच दंड आकारा, अशा घोषणा देत नागरिकांनी कायद्याविरोधातील खदखद यावेळी व्यक्त केली.

आधी चांगले रस्ते द्या आणि मग दंड आकारा

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच तूर्त महाराष्ट्रात अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली. मात्र, भविष्यात मोठ्या दंडाची टांगती तलवार असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती सुरू केली असून त्या विरोधात सोमवारी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. पाचपाखाडी येथून मोर्चाला सुरूवात करण्यात आली असून मोटार वाहन कायद्यातील तरतूदी रद्द करा, आधी चांगले रस्ते द्या आणि मग दंड आकारा, अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिल्या. या मोर्चात अनेक ठाणेकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात कायद्याची अंमलबजावणी करता कामा नये, असा सूर ठाणेकरांनी व्यक्त केला. या मोर्चात काँग्रेसचे नेते वसंत वाघमारे, अजिंक्य भोईर, नीता मगर, पार्वती राजभर, आशा शिशूपाल, जे. डी. बक्षी आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

- Advertisement -

भारतातील बहुतांशी नागरीक कायदाप्रेमी आहेत. मात्र, नव्या मोटार वाहन कायद्यातून सरकारने लूटीचा उद्देश ठेवला आहे. केवळ हेल्मेट परिधान न केल्याने एक हजारांचा दंड, सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. कोणताही सामान्य नागरीक मुद्दामहून वाहतूक नियम भंग करीत नाही. मात्र, किरकोळ नियमभंगावर जबर दंड हा केवळ लूट करण्यासाठी आहे. आगामी काळात कायद्यातील जाचक तरतूदी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडू.  – रवींद्रनाथ आंग्रे; काँग्रेसचे नेते


हेही वाचा – मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला विरोध कायम – उद्धव ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -