घरमुंबईशरद पवारांच्या समर्थनार्थ काँग्रेसही रस्त्यावर

शरद पवारांच्या समर्थनार्थ काँग्रेसही रस्त्यावर

Subscribe

मनसेसह शिवसेनेही दर्शविला पाठींबा

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाण्यास तूर्तास रद्द केले असले तरी त्यांच्या समर्थनार्थ राजकीय नेते पुढे आले आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही पाठींबा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीच्या बलार्ड पिअर येथील कार्यालयाजवळ दाखल झाले होते. त्यांच्यासह इतरही अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी याठिकाणी हजेरी लावत सरकार विरोधात घोषणाबाजी करत यास विरोध दर्शविला.

शिखर बँक प्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवारांनी लवकरच आपण ईडी कार्यालयाचा पाहुणचार घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शरद पवार हे शुक्रवारी ईडी कार्यालयात दाखल होणार होते. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातून त्यांना पाठींबा दर्शविल्यांनंतर आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यानंतर अनेकांनी याविरोधात भाजपविरोधी घोषणा देऊन आपली नाराजी ही व्यक्त केली. पवारांच्या या भूमिकेचे इतर पक्षांनी देखील स्वागत केले होते. शिवसेनेने देखील शरद पवारांना आपला पाठींबा दर्शविला होता. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती. तपास यंत्रेणेचा फायदा कुणीच घेतला नव्हता.हे देशासाठी आणि राजकारणासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त करताना शरद पवार यांना पाठींबा दर्शविण्यात आला होता. त्यानंतर मनसेने देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला आहे.

- Advertisement -

तर काँग्रेसने ही शरद पवारांच्या समर्थनार्थ थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. अनेक कार्यकर्त्यांनी थेट बलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयाजवळीच राष्ट्रवादीच्या कार्यालयात धाव घेतल्याचे चित्र शुक्रवारी सकाळपासून दिसून आले.

सकाळी ७ वाजता – शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे कार्यकर्ते जमायला सुरुवात

- Advertisement -

सकाळी ८ वाजता – पक्षाचे बेलार्ड पिअर येथील कार्यालय आणि पवार यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त

सकाळी ९ वाजता – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी निवासस्थानी पोहोचले

सकाळी ९.३० वाजता – कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त विनय चौबे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला पोहोचले.

सकाळी १० वाजता – छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले

दुपारी १ वाजता – मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले

दुपारी १.३० वाजता – ईडी कार्यालयात जाण्याबद्दल शरद पवारांनी पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केली.

दुपारी २ वाजता – कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ईडी कार्यालयात जात नसल्याचे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -