घरताज्या घडामोडीCoronaVirus: रुग्णवाहिके अभावी आता बेस्ट मधून कोरोना रुग्णांचा प्रवास!

CoronaVirus: रुग्णवाहिके अभावी आता बेस्ट मधून कोरोना रुग्णांचा प्रवास!

Subscribe

आता कोरोनाग्रस्त बेस्ट बसेसमधून प्रवास करणार आहेत. त्यामुळे बेस्टचा चालकाच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.

संपूर्ण विश्वात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत मुंबईतही निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी आता दिवसेंदिवस कोरोना विषाणूच केंद्र बनत आहे. त्यातच आता रुग्णवाहिके अभावी कोरोना रुग्णांची वाहतूक करण्याकरिता बेस्टच्या बसेसचा वापरत असल्याची माहिती समोर आलेली आहे. बेस्टच्या बसेस मार्फत रुग्णाला एका हॉस्पिटल मधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. मात्र त्यांच्या बरोबर नाही पोलीस असते नाही डॉक्टर त्यामुळे सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहेत. चक्क बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप बेस्ट कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू जगभरात धुमाकूळ घालत असून देशभर लॉकडाऊन सुरू आहे. यात रेल्वे सेवासह सार्वजनिक वाहतूक बंद आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना वगळण्यात आली आहे. मात्र, या सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची अट त्यात ठेवण्यात आली होती. याच अत्यावश्यक सेवांचा भाग असलेल्या बेस्टच्या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार सतत समोर येत आहेत. त्यातच आता कोरोनाच्या रुग्णांच्या वाहतुकीसाठी बेस्ट बसेसच्या उपयोग करताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टच्या वडाळा डेपोतून दोन बसेस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाहतुकीसाठी देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बसेस वरळीच्या पोद्दार हॉस्पिटल मधून रुग्णांना घेऊन घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा काम करत आहे. या प्रत्येक बसमध्ये १५ रुग्णांची वाहतूक केली जात आहे. मात्र या बसमध्ये डॉक्टर आणि पोलीस नसतो. फक्त बेस्ट चालक यांच्यावक घेऊन जाण्याची जबाबदारी असते. त्यामुळे चालकांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स दिली जात आहे. मात्र किट घालायची कशी याचं प्रशिक्षण अद्यापही बेस्टच्या चालकाला देण्यात आलेल नाही. त्यामुळे सुरक्षेच्या प्रश्न बेस्ट कामगार संघटनाकडून उपस्थित केला जात आहे. मात्र देशावर आलेल्या संकटात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असल्याने बेस्टचे चालक रुग्णांना घेऊन जाण्याचं काम करताना दिसून येत आहेत

- Advertisement -

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबावा

बेस्ट कर्मचाऱ्यांना आज कोरोना रुग्णांची थेट बसमधून वाहतूक करण्यात येत आहे. मात्र ही वाहतूक करत असताना बेस्टकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. फक्त बसमध्ये चालक रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याच काम करत आहे. प्रवासादरम्यान रुग्णाकडे लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर, पोलीस, कोणीच नसते. जर कदाचित रुग्ण बसमधून पळाला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण असणार असा प्रश्न बेस्ट कामगार संघटना कडून उपस्थित केला आहे.

पूर्व कल्पना द्यायला हवी

ड्युटी वर जात असताना आम्हाला कोणत्याही कल्पना न देता सरळ रुग्णालयात बस घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले होते. रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पीपीई किट्स दिली. मात्र ते घालता येत नसल्यामुळे मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला. मात्र डॉक्टरांच्या दिलेल्या आदेशानुसार किट्स घातले. या संकट काळात आम्ही कर्तव्य बजावले. मात्र कामावर येत असताना याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका चालकांनी दैनिक आपलं महानगरला दिलेली आहे.

- Advertisement -

रुग्णवाहिका असून सुद्धा कोरोना रुग्णांची वाहतूक बेस्टच्या बसेस मधून करत आहेत. त्याचबरोबर या बसमध्ये पोलीस आणि डॉक्टर नसतात. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही चालकावर आली आहे. चालकांना प्रशिक्षण नसताना पीपीई किट्स देऊन चालकांवर जबाबदारी टाकणे अत्यंत चुकीचे आहेत. जर प्रवासादरम्यान कोरोना रुग्ण पळाला तर यांची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांच्या आरोग्याशी खेळ खेळणे थांबवावे. – जगनारायण कहार, सरचिटणीस बेस्ट कामगार संघटना


हेही वाचा – राज्यात धान्य वितरणास सुरूवात: १ कोटी ९ लाख रेशनकार्ड धारकांना लाभ


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -