घरमुंबईमुंबईच्या 'या संस्थेतही होणार कोरोना लस निर्मिती

मुंबईच्या ‘या संस्थेतही होणार कोरोना लस निर्मिती

Subscribe

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी मुंबईतील हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनलाही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. हैद्राबादमधील भारत बायोटेक आणि हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन एकत्र येत मुंबईत कोरोना लसीची निर्मिती करणार आहे. मुंबईत लसीनिर्मितीच्या नवा प्लांटसाठी १५४ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लस निर्मिती उत्पादन संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेला पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबईतील हाफकिन लसी निर्मिती संस्थेला कोरोना लस निर्माण करता येणार आहे.

हाफकिनची लस निर्मिती दोन टप्प्यात होणार आहे. यात हाफकिनमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्पात भारत बायोटेक यांच्याकडील लस हाफकिन मोठ्या प्रमाणात घेणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनकडून रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल, भारतामध्ये सध्या भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ इंडिया मेडिकल रिसर्चमार्फत लस निर्मिती केली जाते. यांची कोवॅक्सिन या नावाची ही लस सध्या बाजारात आणली आहे.

- Advertisement -

यातील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. त्यामुळे केंद्र सरकारची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्थाकडून हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस मोठ्या स्वरुपात मिळाल्यास येत्या एप्रिल आणि मेदरम्यान हाफकिनची लस बाजारात उपलब्ध होईल. परंतु हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला स्वतंत्रपणे कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोरोना लसी निर्मितीसाठी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्लांटवर गरज असेल तोपर्यंत कोरोना लस निर्मिती केली जाईल, त्यानंतर हा प्लांट श्वान दंशावरील लस निर्मितीसाठी वापरला जाईल, किंवा वेळोवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठीही या प्लांटचा वापर होईल.

हाफकिन संस्थाच्या लसनिर्मिती क्षेत्रातील इतिहास

डॉ. हाफकिन लौसन यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय सुविधा एवढ्य़ा प्रगत नसता देशभर पसरलेल्या गंभीर कॉलरा या साथीवर प्रभावी लसीची निर्मित केली. यामुळे लसीनिर्मिती क्षेत्रात आजही हाफकिनचे नाव घेतले जाते. १८९८ च्या प्लेगच्या भीषण साथीवरही हाफकिन यांनी लस विकसित केली. मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये एका छोट्या प्रयोग शाळेत बसून त्यांनी ही लस निर्माण केली होती. या प्रयोगशाळेचे नंतर १९०५ मध्ये बॉम्बे बॅक्टेरियॉलॉजिकल लॅब असे नामकरण करण्यात आले, यानंतर डॉ. हाफकिन यांच्या मृत्यूच्या ५ वर्ष आधी या लस निर्मिती प्रयोगशाळेला डॉ. हाफकिन यांचे नाव देण्यात आले. आजही प्रयोगशाळा हाफकिन इन्स्टिट्यूट या नावाने ओळखली जात आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -