घरमहाराष्ट्रनाथाभाऊंचा 'जळगाव फॉर्म्युला', १० दिवसात केला भाजपचा 'गेम'

नाथाभाऊंचा ‘जळगाव फॉर्म्युला’, १० दिवसात केला भाजपचा ‘गेम’

Subscribe

जळगाव महानगर पालिकेची आज ऑनलाईन निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेनेजळगाव पालिकेवर भगवा फडकला. बहुमत असताना देखील भाजपचा पराभव झाला. भाजपच्या पराभवामागे एकनाथ खडसे यांचा हात आहे. एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच “बदल करून दाखवेन”, असा शब्द व्यासपीठावर जाहीरपणे देत भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या निवडणुकीत भाजपचा कसा पराभव केला, याचा खुलासा केला आहे. भाजपचा पराभव केवळ १० दिवसात केला, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

जळगावात एकहाती सत्ता असलेल्या भाजपला पराभूत करण्यासाठी १० प्लॅन तयार झाला, असा खुलासा खडसेंनी केला. या प्लॅनबद्दल कोणाला काहीच माहित नव्हतं. चार नेत्यांमध्ये निर्णय करत भाजपला धूळ चारली, असलं खडसे म्हणाले. १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो आणि भाजपच्या पराभवाचा प्लॅन तयार केला.

- Advertisement -

१० दिवसांपपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि प्लॅन केला

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्याशी निवडणुकीच्या रणनिती संदर्भात चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते. तसंच जळगावात भाजपची एकहाती सत्ता होती. पण कामं होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.


हेही वाचा – जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा; जयश्री महाजन नव्या महापौर

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -