घरमुंबईदोन वर्षात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पश्चिम उपनगरात

दोन वर्षात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पश्चिम उपनगरात

Subscribe

अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरले आहेत. सर्वाधिक रुग्णांबरोबरच पश्चिम उपनगरात मृत्यूंची नोंदही अधिक झाली आहे.

काही दिवसांपासून मुंबईमध्ये दररोज ६०० पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र मागील दोन वर्षांचा मुंबईतील कोरोनाचा आढावा घेतला तर मुंबईतील सर्वाधिक रुग्ण हे पश्चिम उपनगरांमध्ये आढळले आहेत. यामध्ये अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरले आहेत. सर्वाधिक रुग्णांबरोबरच पश्चिम उपनगरात मृत्यूंची नोंदही अधिक झाली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोजी आढळल्यानंतर आतापर्यंत १० लाख ५१ हजार ३७३ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत एकापाठोपाठ आलेल्या तीन लाटांमध्ये १० लाख २६ हजार १४४ कोरोना रुग्णांनी मात केली तर १६ हजार ६६१ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद ही अंधेरी पश्चिम भागात झाली आहे. या भागामध्ये कोरोनाचे आजपर्यंत ९० हजार ४८३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे अंधेरी पूर्व ६९ हजार २५०, बोरिवली ६८ हजार ६१८, कांदिवली ६३ हजार ४८७, मालाडमध्ये ६१ हजार १४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण मुंबई शहर विभागामध्ये आढळून आले. सँडहर्स्ट रोडमध्ये सर्वाधिक कमी रुग्ण ५१५४, मरिन लाईन्स ८७९१, फोर्ट कुलाबा येथे २६ हजार ७६७ रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आतापर्यंत १० लाख २६ हजार १४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अंधेरी पश्चिममध्ये बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ८८ हजार ७९५ इतके आहे. तर अंधेरी पूर्वमध्ये ६७ हजार २५२, बोरिवलीमध्ये ६७ हजार २४१, कांदिवलीमध्ये ६२ हजार १२७, मालाडमध्ये ५९ हजार ६३१, सँडहर्स्ट रोड ४९११, मरिन लाईन्स ८४२४ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

सर्वाधिक मृत्यू झालेले विभाग

मुंबईमध्ये दुसर्‍या क्रमांकाची नोंद झालेल्या अंधेरी पूर्व या विभागात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अंधेरी पूर्वेला १३१८, त्याखालोखाल भांडूपमध्ये १०६६, बोरिवलीत ९९९, मालाडमध्ये ९९०, कांदिवलीमध्ये ९०५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबईमध्ये सर्वात कमी मृत्यू कुलाबा फोर्ट ए विभागात १७८, सँडहर्स्ट रोड येथे १९५ तर मरिन लाईन्स येथे २६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -