घरताज्या घडामोडीDelta Variant: डेल्टामुळे तिपटीने वाढला एक्टोपिक गर्भधारणेचा धोका; रिसर्चमधून समोर

Delta Variant: डेल्टामुळे तिपटीने वाढला एक्टोपिक गर्भधारणेचा धोका; रिसर्चमधून समोर

Subscribe

जेव्हापासून कोरोना महामारीचा जन्म झाला तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचे ४०० हून व्हेरिएंट जगभरात आढळले आहेत. यामध्ये अल्फा, बीटा, डेल्टा, ओमिक्रॉन व्हेरिएंट जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जाते. एका रिसर्चमध्ये खुलासा झाला आहे की, डेल्टा व्हेरिएंट गर्भवती महिलांसाठी जास्त धोकादायक आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे अस्थानिक गर्भधारणा म्हणजेच एक्टोपिक गर्भाधारणचा धोका तिपटीने वाढला आहे.

आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी १६६० गर्भवती महिलांवर अभ्यास केला. हा अभ्यास पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान मुंबईच्या बीवाईएल नायर रुग्णालयात केला गेला आहे. एका अहवालानुसार आयसीएमआरचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. राहुल भजभिए म्हणाले की, ‘२०२०मध्ये महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये एक हजार गर्भवती महिल्यांपैकी ६ महिल्यांमध्ये अस्थानिक गर्भधारणेचा धोका होता. तसेच कोरोनाची दुसऱ्या लाट आली आणि डेल्टाचा प्रसार झाला तर प्रति हजारांपैकी १९८ आणि १९ महिल्यांमध्ये अस्थानिक गर्भधारणेचा धोका होता. म्हणजे डेल्टा व्हेरिएंटमुळे अस्थानिक गर्भावस्थाचा धोका तिपटीने वाढला आहे.’

- Advertisement -

तर दुसऱ्या अभ्यासानुसार, जी महिल्या गर्भधारणेदरम्यान कोरोनाबाधित होते, तिच्यामध्ये प्री-एक्लॅम्पसिया विकसित होण्याचा खूप धोका असतो. जगभरातील माता आणि मुलाच्या मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. प्री-एक्लॅम्पसिया म्हणजे गर्भधारणेच्या २०व्या आठवड्यानंतर रक्तदाब वाढणे.

एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे काय?

महिलेच्या शरीराला गर्भधारणापासून ते बाळ होण्यापर्यंत अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. यामध्ये एक प्रक्रिया आहे फर्टिलाइज्ड अंडे गर्भाशयापर्यंत योग्य मार्ग पोहोचणे. हे अंडे गर्भाशयाला जोडलेल्या फॅलोपियन नळीच्या माध्यमातून गर्भाशयात पोहोचते. परंतु जेव्हा पोटाच्या खालच्या भागात गोठलेली पोकळी किंवा गर्भाशय ग्रीवा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ती नळीमध्ये विकसित होऊ लागते तर या स्थितीला एक्टोपिक गर्भधारणा किंवा अस्थानिक गर्भधारणा म्हणतात.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी प्रतिकारकशक्ती करायची आहे मजबूत?, तर प्या ‘हे’ पेय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -