घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३८२ नवे रुग्ण, आज ४२ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३८२ नवे रुग्ण, आज ४२ मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली असताना मुंबईत देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १३८२ने वाढून २५ हजार ३१७वर जाऊन पोहोचली आहे. शिवाय, आज दिवसभरात कोरोनाच्या ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मुंबईतला आकडा आता ८८२वर गेला आहे. आज दिवसभरात २८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून मुंबईत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ७५१ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या ४१ रुग्णांपैकी २३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये २४ पुरूष आणि १७ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ३ रुग्ण ४० वर्षांच्या खालचे, २१ रुग्ण ६० वर्षांच्या वरचे आणि १७ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातले होते.

corona cases mumbai letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -