घरCORONA UPDATECoronavirus: कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या तिजोरीची लूट, कोट्यवधीचा भ्रष्टाचार

Coronavirus: कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या तिजोरीची लूट, कोट्यवधीचा भ्रष्टाचार

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपचाराकरता विविध खासगी कंपन्या आणि संस्थांकडून आर्थिक तसेच वस्तू स्वरुपात मदत घेण्याचा प्रयत्न एका बाजुला सुरु असतानाच दुसऱ्या बाजुला या रुग्णालयाच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची लूट सुरु आहे. उपनगरातील कुपर रुग्णालय आणि जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर या दोन रुग्णालयातील मेडिकल पाईपलाईच्या दुरुस्ती व देखभालीसाठी तब्बल ४३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात लढतानाच याचाच आधार घेत यासाठी निविदा मागवून मेडिकल पाईपच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पुढील ९ वर्षांचे कंत्राट देण्याचा घाट घातला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या डॉ. आर.एन. कुपर रुग्णालय आणि जोगेश्वरीतील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर महापालिका रुग्णालय आदी रुग्णालयांमधील मेडिकल गॅस पाईप लाईनच्या दुरुस्ती व पुढील ९ वर्षांच्या देखभालीसाठी महापालिकेने निविदा मागवली आहे. ४३ कोटी रुपयांच्या अंदाजित कामासाठी निविदा मागवली आहे. विशेष म्हणजे ही कामे अत्यावश्यक नसून कोरोनासाठी आवश्यक असलेली कामे प्रथम करण्याऐवजी या कोरोनाच्या काळात याबाबतची निविदा काढून काही ठराविक कंत्राटदाराला घाट देण्याचा प्रशासनाच डाव आहे.

- Advertisement -

ट्रामा केअर व कुपर रुग्णालये सहा वर्षांपूर्वी सुरु झाली आहेत. त्यामुळे सर्व यंत्रण कार्यान्वित असतानाही केवळ दुरुस्तीच्या नावाखाली हे कंत्राट एकप्रकारे कंत्राटदाराचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे. या दोन्ही रुग्णालयात कोरोनासंदर्भातील यंत्रणा आणि सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात याच काळात याबाबतची निविदा देवून पुढील ९ वर्षाच्या देखभालीचे काम देत त्यावर ४३ कोटींचा खर्च करणे हा मोठा गैरप्रकार असल्याचेही रुग्णालयीन कर्मचारऱ्यांचे म्हणणे आहे. या निविदेसंदर्भात प्रि-ब्रीड बैठक २९ एप्रिल रोजी पार पडली. परंतु प्रत्यक्षात जागेची पाहणी न करता तसेच किती कामे करावे लागेल याची कोणतीही माहिती न देता प्रशासनाने ४३ कोटींची निविदा काढल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोनाऐवजी दुसऱ्याच गोष्टींकडे लक्ष आहे. कोरोनासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या न करता हे अधिकारी भलत्याच कामांकडे पाहत आहे. कुपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात मेडिकल पाईपच्या दुरुस्ती व देखभालीवर ४३ कोटींच्या कामांसाठी कोरोनाच्या आडून निविदा काढणे हे जरी योग्य असले तरी त्यातील रक्कम पाहता नक्की याचे इस्टीमेट काय आहे हे समोर यायला आहे. महापालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी कुणालाही न विचारता कोरोनाच्या नावाखाली आणि कोरोनाच्या काळात खर्च करून एकप्रकारे लोकप्रतिनिधींपासून लपवत कामांची कंत्राटे देत आहेत. परंतु आजची परिस्थिती पाहता आम्ही शांत असलो तरी परिस्थिती निवळल्यानंतर आयुक्तांना आम्ही याचा जाब विचारणारच आहोत,असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाचे उपप्रमुख अभियंता विजय पाचपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ही निविदा जनरल कामांसाठी आहे. यापूर्वी ज्या कंत्राटदाराने याचे काम केले होते. त्यांचा हमी कालावधी व त्यानंतरचा देखभाल कालावधी संपुष्ठात आला . सध्या या कामांमुळे काही तांत्रिक दोष असल्यास संबंधित कंत्राटदारांकडून दूर केले जातात. रुग्णालयीन कामांमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होवू नये म्हणून या पाईपची दुरुस्तीची कामे करून एक वर्षाच्या हमी कालावधीसह एकूण ९ वर्षाच्या देखभालीचे कंत्राट काम दिले जाणार आहे. यासाठी फेबुवारी महिन्यात निविदा काढण्यात येणार होती. परंतु पुढे कोरोनामुळे विलंब झाल्याने तसेच पुढे अधिक विलंब होवून नये म्हणून आता याबाबतची निविदा काढली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -