घरमुंबई'आपले सरकार' प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीकडून घोळ

‘आपले सरकार’ प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीकडून घोळ

Subscribe

संग्राम प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीने मागील २ वर्षात अनेक गैरप्रकार केले असून या कंपनीवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

संग्राम प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर ११ ऑगस्ट २०१६च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात ‘आपले सरकार’ हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी दिल्लीच्या CSC-SPV e-Governance Services India Ltd या केंद्रशासन पुरस्कृत कंपनीची नेमणूक राज्य शासनाने केली. सदर कंपनीने मागील २ वर्षात अनेक गैरप्रकार केले असून या कंपनीवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे दिली आहे.

राज्यातील २८,९३१ ग्रामपंचायती ,३५१ पंचायत समिती आणि ३४ जिल्हा परिषदेच्या कामकाजात सुसूत्रता आणणे. ऑनलाईन कामकाजाच्या माध्यमातून भ्रष्टाचार रोखून पारदर्शकता आणणे. हा मुख्य उद्देश ठेऊन राज्यात संग्राम आणि आपले सरकार हे प्रकल्प ७ वर्षापासून सुरू आहेत. पण, या प्रकल्पाचे काम करणार्‍या कंपन्यानीने या दोन्ही प्रकल्पात कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करून प्रकल्पाच्या मुख्य उद्देशालाच हारताळ फासला आहे. संग्राम प्रकल्प एप्रिल २०११ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत राबवण्यात आला. या प्रकल्पात महाऑनलाईनच्या माध्यमातून काम करण्यात आले. त्यात युनीटी आयटी नावाच्या कंपनीला महाऑनलाईनने हे काम दिले होते. या कंपनीने संगणक परिचालकांचे मानधन हडप करणे, सॉफ्टवेअर तसेच स्टेशनरीचा पुरवठा न करता १३व्या वित्त आयोगाचा कोट्यवधी रूपयांचा निधी हडप केला होता. संगणक परिचालक संघटनेने त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी संग्राम प्रकल्पाऐवजी आपले सरकार हा प्रकल्प ऑगस्ट २०१६ पासून सुरू करताना महाऑनलाईन लि. मुंबई आणि युनिटी आय टी, पुणे या कंपन्यांना बाजूला केले. तर, CSC-SPV e-Governance Services India Ltd या दिल्लीच्या केंद्र शासन पुरस्कृत कंपनीला ‘आपले सरकार’ प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त केले. पण, या कंपनीने सुद्धा विशेषतः संगणक परिचालक आणि कंपनीचा कामाबाबत कुठल्याही प्रकारचा करार झालेला नसताना कंपनीकडून मानधनात कपात केली जाते. अनेक ग्रामपंचायतींना स्टेशनरी न पुरवता १४व्या वित्त आयोगाचा निधी हडप करण्यात येत आहे. तसेच ई-ग्राम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रामपंचायती पेपेरलेस करण्याचे नियोजन असताना अनेक कार्यशाळा घेऊन सुद्धा त्यात सुधारणा झालेली नाही. २ वर्षात अनेक गैरप्रकार करणार्‍या CSC-SPV e-Governance Services India Ltd Delhi या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

संग्राम हा प्रकल्प महाऑनलाईन लिमिटेड मुंबई या कंपनीने राबवला असला तरी त्यांच्याकडून युनिटी आय टी कंपनीला काम देण्यात आले. त्यांनी शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केला. त्यावेळी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -