घरमनोरंजननिखिल, चिन्मय आणि प्रसादने 'काहीतरी मागवलयं!'

निखिल, चिन्मय आणि प्रसादने ‘काहीतरी मागवलयं!’

Subscribe

सध्या नवीन आलेल्या नाटकाचं, चित्रपटाचं प्रमोशन सोशलमीडियाचा आधार घेऊन हटके पध्दतीने केले जाते. काही दिवसांपूर्वीच 'दादा,मी प्रेग्नंट आहे' या नाटकाचे सोशलमिडीयावर एका वेगळ्या पध्दतीने प्रमोशन करण्यात आले होते.

हल्ली काही नवीन गोष्टीची ओळख करुन द्यायची तर सोशल मीडिया हे फर्स्ट क्लास ऑप्शन आहे. नवीन येणारा सिनेमा असो की नाटक या सगळ्याचे प्रमोशन केले सोशल मीडियावर केले जाते. सध्या सोशल मीडियावरील एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता निखिल राऊत, चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या तिघांनी सारखीच पोस्ट शेअर केल्यामुळे एखाद्या चित्रपटाचं किंवा नाटकाच प्रमोशन असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या तिघांनी लिहीलेल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की ‘ऑनलाईन मागवलय….नव्या वर्षात येतोय’. ही पोस्ट लिहिताना #Vaccumcleaner वापरण्यात आला आहे. मात्र अद्याप हे कोणत्या चित्रपटाचं किंवा नाटकाचं प्रमोशन आहे हे अद्याप कळलेलं नाही.

‘सुपर डान्सर’चा फिनाले रंगणार

पोस्ट आहे खास?

सोशल मीडियावर असलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही पोस्ट निखिल राऊत, चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक या तिघांनी शेअर केली असली तरी यात राहुल रानडे, दिलीप जाधव यांना टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात या मंडळींकडून मस्त नवीन प्रोजेक्ट बघायला मिळणार असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. लवकरच या पोस्टबद्दल ही खुलासा करण्यात येईल, हे मात्र नक्की!

- Advertisement -
माणसाची ताकद छातीच्या इंचावरून ठरत नाही; ‘ठाकरे’मध्ये मोदींना टोला

या आधीही सोशल मीडियाचा वापर

सध्या नवीन आलेल्या नाटकाचं, चित्रपटाचं प्रमोशन सोशलमीडियाचा आधार घेऊन हटके पध्दतीने केले जाते. काही दिवसांपूर्वीच ‘दादा,मी प्रेग्नंट आहे’ या नाटकाचे सोशलमिडीयावर एका वेगळ्या पध्दतीने प्रमोशन करण्यात आले होते. या आधी ‘मस्का’ या चित्रपटाचं देखील अनिकेत विश्वासराव चोरी झाल्याचा खोटा व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल केला होता. तर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या प्रमोशनच्यावेळी तुमचे बालपणीचे फोटो टाकून आपल्या मित्रांना टॅग करा अवाहन सोशलमिडीयावर केलं होतं. तर ‘मुरांबा’ या चित्रपटाच्यावेळी अमेय वाघ आणि मिथीला पालकरने ‘माय व्हॅलेंटाईन’ या हॅशटॅग खाली एक फोटो शेअर करत मुरांबाच्या प्रमोशनला सुरूवात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -