घरमुंबईमहापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिकांचे 'खासगीकरण'

महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिकांचे ‘खासगीकरण’

Subscribe

रुग्णांच्या सुविधांसाठी सहा रुग्णालयात भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे कंत्राट सप्टेंबर २०१८ ला संपुष्ठात आले. त्यामुळे पुढील दोन वर्षांकरता महापालिकेच्या आठ रुग्णालयांसाठी एकूण २३ रुग्णवाहिन्या दोन वर्षांकरता भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या सहा रुग्णालयांसाठी भाडेतत्वावर साध्या तसेच कार्डियाक अ‍ॅब्युलन्स घेत या रुग्णवाहिका सेवेचे खासगीकरण करण्याचा डाव महापालिका प्रशासनाने रचला आहे. भाडेतत्वावर रुग्णवाहिकांची सेवा घेतली जाऊ नये याकरता सत्ताधारी पक्ष वगळता विरोधकांनी विरोध केला. परंतु त्यानंतरही प्रशासन ठाम असून रुग्णवाहिका खरेदी केल्यास मनुष्यबळासह इतर सामुग्रीवरील खर्च वाढला जाईल. यापेक्षा भाडेतत्वावरील रुग्णवाहिका याच महापालिकेच्या आर्थिक फायद्याच्या असल्याची कारणे देत हा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी पुढे रेटला आहे.

मुंबई मनपाचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

भाडेतत्वाऐवजी या रुग्णवाहिका खरेदी करणे योग्य

रुग्णांच्या सुविधांसाठी सहा रुग्णालयात भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे कंत्राट सप्टेंबर २०१८ ला संपुष्ठात आले. त्यामुळे पुढील दोन वर्षांकरता महापालिकेच्या आठ रुग्णालयांसाठी एकूण २३ रुग्णवाहिन्या दोन वर्षांकरता भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी ९.९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. परंतु याला विरोधी पक्षांसह पहारेकर्‍यांनी तीव्र विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्यात आला होता.परंतु हाच प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने पुन्हा एकदा पटलावर घेतला आहे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेच्या मुद्दयांना उत्तरे देत प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुर करण्याची मागणी केली आहे. रुग्णवाहिकांची सेवा खासगी संस्थांकडूनही मोफत मिळू शकते, तसेच भाडेतत्वाऐवजी या रुग्णवाहिका खरेदी करणे योग्य ठरेल असा युक्तीवाद सदस्यांनी मांडला होता.

- Advertisement -
फलकबाजीमुळे नवी मुंबईचे बकाल स्वरूप

तर महापालिकेला आर्थिक फायदा

मात्र,नवीन महापालिकेने नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्यास नवीन रुग्णवाहिकेच्या किंमतीव्यतिरिक्त दैनंदिन डिझेल, वाहनचालक, वाहन स्वच्छक यांचा पगार, गाडीचा आणि त्याव्यतिरिक्त आतील वैदयकीय व इतर उपकरणांचा दैनंदिन देखभालीचा खर्च, तसेच अपुर्‍या मनुष्यबळामुळे होणारा खर्च भाडेतत्वावरील रुग्णवाहिकांच्या खर्चाच्या तुलनेत अधिक आहे. भाडेतत्वावरील रुग्णवाहिका घेतल्यास महापालिकेला आर्थिक फायदा होईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सेवाभावी संस्थांकडून रुग्णालयास लेखी स्वरुपात प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. जर रुग्णवाहिका पुरवणार्‍या कंत्राटदाराने कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता येवू शकते,असे म्हटले आहे. मात्र याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोध केला आहे. या रुग्णवाहिका खरेदी केल्यास चार ते साडेचार कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. परंतु महापालिका प्रशासन सुमारे १० कोटी रुपये खर्च करून रुग्णवाहिका सेवेचे खासगीकरण करत असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -