घरमुंबईतर मार्क्स तुमच्या मागे येतील; मोदींचे ३ इडियट स्टाईल 'ज्ञान'

तर मार्क्स तुमच्या मागे येतील; मोदींचे ३ इडियट स्टाईल ‘ज्ञान’

Subscribe

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधांनाचा विद्यार्थ्यांना सल्ला

काही वर्षांपूर्वी आमिर खान याच्या गाजलेल्या थ्री इडियट या सिनेमातला एक डॉयलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. “कामयाबी के पिछे मत भागो… काबिल बनो, कामयाबी अपने आप पिछे आयेगी”. याच डॉयलॉगची कॉपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. “आपण गुणांच्या मागे धावतो पण ज्ञान मिळवल्यास गुण आपल्या मागे धावत येतील. त्यामुळे परीक्षेचे कधीच ओझे वाटणार नाही, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘चाय पे चर्चा २’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिला. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने आयुष्य संपत नसते. परीक्षेच्या बाहेरही मोठे जग आहे. त्यामुळे परीक्षेला एक संधी समजल्यास ताण आपोआप कमी होईल, असेही ते म्हणाले.

नवी दिल्लीतील तालकोटा स्टेडियमधून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा 2’ या कार्यक्रमातून परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांमधील तणाव दूर करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी चर्चा केली. या कार्यक्रमाला देशातीलच नव्हे तर रशिया, नायजेरीया, इराण, नेपाळ, दोहा, कुवेत, सिंगापूर, साऊथ अरेबिया या देशातील विद्यार्थीही उपस्थित होते. तसेच, हा कार्यक्रम अन्य देशांमध्येही थेट दाखवण्यात आला.

- Advertisement -

परीक्षेच्यावेळी घरातून अभ्यास करण्याचा तगादा लागण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी हे प्रचंड तणावाखाली असतात. परंतु, ही परीक्षा आयुष्याची नसून एका वर्गाची असते, असा विचार केल्यास मनावरील ताण कमी होईल. आयुष्यामध्ये परीक्षा असणे फार महत्त्वाचे आहे. परीक्षेतून देवाने आपल्याला दिलेले सामर्थ्य जाणून घेता येते. त्यामुळे परीक्षेला नेहमी एक संधी समजले पाहिजे. तसे केल्यास आनंद मिळेल व परीक्षेतून आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा मिळेल, असा सल्ला मोदी यांनी दिला.

पालकही त्यांच्या इच्छा मुलांवर लादण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना डॉक्टर, इंजिनीयर बनता आले नसल्याने ते मुलाने व्हावे यासाठी ते मुलांच्या मागे लागतात. त्यांच्यावर दबाव आणतात. पण, दबाव टाकल्याने त्याची प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच असते. त्यामुळे पालकांनी असे करू नये. त्याऐवजी त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा. असे करण्यासाठी पालकांना कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही. अनेक पालक लग्न, समारंभ, विविध कार्यक्रमामध्ये मित्र परिवारामध्ये आपल्या मुलांचे रिपोर्ट कार्ड हे विजिंटींग कार्ड म्हणून घेऊन जातात. मुलांचे यश व अपयशाकडे ते सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पाहत असतात. पण, हे करत असताना ते आपल्यार मुलासोबतचे नाते तोडत असतात. आपले बाळ लहान असताना त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. परंतु, तेच बाळ आठ ते नऊ वर्षांचे झाल्यावर पालक त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, हे निरीक्षण कायम ठेवल्यास पालक व विद्यार्थ्यांमधील संवाद उत्तम राहून मुलांना चांगले मार्गदर्शन मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

मला उपदेश द्यायचा नाही

माझ्यासमोर लघुभारत उपस्थित आहे. त्याचबरोबर हा भावी भारतही आहे. पालक, शिक्षक नसते तरी ही चर्चा अपूर्ण राहिली असती. आजची चर्चा ही आपण एका परिवारामध्ये बसून करत आहोत, असे समजा. कारण मला कोणालाही उपदेश कारायचा नाही. मी येथे आपल्यासोबत तुमच्याप्रमाणे जगण्यासाठी आलो आहे, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली.

पालकांना विरोध नको

आपल्याला आई-वडील काही सांगत असतील तर आपण त्यांना चुकीचे ठरवून त्यांच्याशी वाद घालतो. पण, त्यांना लगेच विरोध करू नका. प्रथम त्यांचे ऐकून घ्या. त्यानंतर आई-वडिलांचा मूड चांगला असेल तेव्हा त्यांना आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा. तसेच, तुम्ही सांगितलेले मी करण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्यामध्ये काही समस्या येत आहेत. असे केल्याने ते तुमच्या बाजूने विचार करतील.

मुलांची तुलना करू नको

आपल्या मुलांची अन्य मुलांशी तुलना करू नका. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनंगड तयार होऊन ते मानसिक तणावाखाली येतात. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहित केल्यास ते भविष्यात 40 टक्क्याहून नक्कीच 90 टक्के मिळवतील. त्यामुळे त्यांना कमी गुण पडले म्हणून बोलू नका.

गेल्यावर्षीपासून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्याचा सुरू केलेला कार्यक्रम स्तुत्य आहे. हा उपक्रम विद्यार्थी व पालकांमध्ये लोकप्रिय होत आहे व त्याचा लाभ नक्कीच इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना होईल. राज्य सरकारमधील अधिकार्‍यांनी इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात का समाविष्ट करण्यास लावले. कारण सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांची क्षमता व आकलन याबाबत मर्यादा आहेत.
– प्रशांत रमेश रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -