घरक्रीडा२०२० आयसीसी टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

२०२० आयसीसी टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या महिला आणि पुरुषांच्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले. महिला टी-२० विश्वचषकाला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर, या विश्वचषकाचा अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुषांचा विश्वचषक १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत महिलांच्या १० तर पुरुषांच्या १२ संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. या संघांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील ८ शहरांमधील १३ मैदानांवर दोन्ही विश्वचषकांचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

महिला टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. भारतासोबत या गटात गतविजेता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पात्रता फेरीतील एका संघाचा समावेश आहे. तर, ब गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, द. आफ्रिका, पाकिस्तान आणि पात्रता फेरीतील एका संघाचा समावेश आहे.

- Advertisement -

तसेच, पुरुषांच्या टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघ ब गटात आहे. या गटात भारतासोबत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पात्रता फेरीतील २ संघांचा समावेश आहे. तर, अ गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पात्रता फेरीतील २ संघांचा समावेश आहे. मुख्य स्पर्धेच्या आधी होणार्‍या पात्रता फेरीत एकूण ८ संघांचा समावेश असेल. हे संघ २ गटांत विभागले असून, प्रत्येक गटातील अव्वल २ संघ मुख्य स्पर्धेत प्रवेश करतील. भारताचा या विश्वचषकातील पहिला सामना २४ ऑक्टोबरला द.आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

भारतीय पुरुष संघाचे सामने :

सामना क्र.तारीख विरुद्ध ठिकाण

- Advertisement -

१. २४ ऑक्टोबर द.आफ्रिका पर्थ
२. २९ ऑक्टोबर पात्रता फेरीच्या अ गटातील मेलबर्न
दुसर्‍या स्थानावरील संघ
३. १ नोव्हेंबर इंग्लंड मेलबर्न
४. ५ नोव्हेंबर पात्रता फेरीच्या ब गटातील अ‍ॅडलेड
पहिल्या स्थानावरील संघ
५. ८ नोव्हेंबर अफगाणिस्तान सिडनी

भारतीय महिला संघाचे सामने :

सामना क्र. तारीख विरुद्ध ठिकाण

१. २१ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया सिडनी
२. २४ फेब्रुवारी पात्रता फेरीतील संघ पर्थ
३. २७ फेब्रुवारी न्यूझीलंड मेलबर्न
४. २९ फेब्रुवारी श्रीलंका मेलबर्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -