घरमुंबईकंगनाला न्यायालयाकडून आणखी एक दणका

कंगनाला न्यायालयाकडून आणखी एक दणका

Subscribe

निर्णयाविरोधात हायकोर्टात अपिल करण्यासाठी कंगनाला ६ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. सहा आठवड्यानंतर कंगनाच्या घरावर अधिकृत कारवाई करण्याचे अधिकार पालिकेला देण्यात आले आहेत.

कंगनाच्या खार दिंडोशी येथील घरात केलेले वाढीव काम हे अनधिकृत असल्याचा निकाल न्यायलयाने दिल्याने कंगनाला आता आणखी एक दणका बसला आहे. खारघरमध्ये केलेले वाढीव बांधकाम हे अनधिकृत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपिल करण्यासाठी कंगनाला ६ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. सहा आठवड्यानंतर कंगनाच्या घरावर अधिकृत कारवाई करण्याचे अधिकार पालिकेला देण्यात आले आहेत.

खार पश्चिम येथे कंगनाचे एकाच इमारतीमध्ये एकाच मजल्यावर तीन फ्लॅट आहेत. हे तिन्ही फ्लॅट कंगनाच्या मालकीचे आहेत. हे तिन्ही फ्लॅट कंगनाने एकमेकांशी जोडले आहे. कंगनाने फ्लॅट एकत्र करताना मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त जागा ही अतिक्रमित केली आहे. लॉबी, पॅसेज अशा जागाही एकत्र करण्यात आल्या आहेत. एकत्र केलेले काम मंजूर आराखड्यात नसल्याने पालिकेने २०१८ साली कंगनाला नोटीस दिली होती. काल न्यायालयाने हे बांधकाम अनधिकृत असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

गेली काही महिने कंगना ही बऱ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय झाली आहे. या आधीही कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर पालिकेने कारवाई केली होती. त्यावरूनही कंगना चांगलीच चर्चेत आली होती. कंगनाच्या खार येथील फ्लॅटवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने कंगनाला आणखी एक दणका दिला आहे.


हेही वाचा – मुंबईत अवघे ४३४ क्षयरुग्ण; पालिकेच्या मोहीमेला यश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -