घरक्राइमCrime News : चार वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीला मुंबई विमानतळावर अटक

Crime News : चार वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीला मुंबई विमानतळावर अटक

Subscribe

गेल्या चार वर्षांपासून अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत करून तरुणीची बदनामी करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपीविरोधात पंजाब पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत करून तरुणीची बदनामी करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपीविरोधात पंजाब पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर याला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर देखील जारी केले होते. पण तो परदेशात वास्तव्यास असल्याने त्याला अटक करण्यात आले नव्हते. परंतु, अखेरीस मुंबईतील सहार पोलिसांनी या आरोपीला मुंबई विमानतळावर अटक केली. हरज्योतसिंह सुखदेव सिंह (वय वर्ष 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Crime News Accused wanted for four years arrested at Mumbai airport)

मिळालेल्या माहितीनुसार, हरज्योतसिंह सुखदेव सिंह याची पंजाबमध्ये एका मुलीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पण यानंतर या आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला होता. या लैगिंक अत्याचाराचे त्याने मोबाईलवर व्हिडीओ बनविले होते. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिची चित्रफीत समाजमाध्यमांवर वायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. पण काही दिवसांनी त्याने ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पिडीत तरुणीसह तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच तिने काबुली पुतला पोलीस ठाण्यात आरोपी हरज्योतसिंह विरोधात तक्रार दाखल होती.

- Advertisement -

हेही वाचा… Delhi Masala Racket : दुध, तांदळानंतर आता मसाल्यातही भेसळ; दिल्लीत 15 टन बनावट मसाला जप्त

पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी हरज्योतसिंह विरोधात लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याच्या धमकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पंजाबहून दुबईला पळून गेला होता. पोसिलांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता आरोपी हरज्योतसिंह हा विदेशात पळून गेल्याचे उघड झाले. ज्यानंतर पंजाब पोलिसांकडून या आरोपीविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. तो सतत दुबई, मलेशिया या ठिकाणी आपले वास्तव्य बदलत असल्याची माहिती पोलिसांनी मिळत होती. त्यामुळे त्याला अटक करणे, पोलिसांना अवघड झाले होते.

- Advertisement -

परंतु, दोन दिवसांपूर्वी आरोपी हरज्योचसिंह दुबई आणि मलेशिया येथे राहिल्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच सुरुवातीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला पुढील कारवाईसाछी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले. ही माहिती नंतर सहार पोलिसांकडून पंजाब पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पंजाब पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. रविवारी (ता. 05 मे) या पथकाने हरज्योतसिंहचा ताबा घेतला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : प्रचार संपल्यानंतर बारामतीत गुंडाच्या वापरावरुन राजकारण; रोहित पवार – मिटकरी आमनेसामने


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -