घरताज्या घडामोडीCyclone Tauktae:चक्रीवादळामुळे २,३६४ झाडे, फांद्या यांची पडझड; एका महिलेचा मृत्यू

Cyclone Tauktae:चक्रीवादळामुळे २,३६४ झाडे, फांद्या यांची पडझड; एका महिलेचा मृत्यू

Subscribe

धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले जात असल्याचा पालिकेचा दावा

मुंबईत तौत्के चक्रीवादळामुळे २४ तासात तब्बल २ हजार ३६४ झाडे / फांद्या यांची पडझड झाली. वरळी येथे झाड कोसळून संगीता खरात (४५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात चक्रीवादळामुळे झाडे- फांद्या कोसळून पडल्याच्या एकूण २ हजार ३६४ तक्रारींपैकी ६६६ तक्रारी शहर भागामधून, ५९५ तक्रारी पूर्व उपनगरामधून तर १ हजार १०३ तक्रारी पश्चिम उपनगरामधून आल्याची नोंद पालिकेकडे करण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे, फांद्या यांच्या दुर्घटना घडत असल्याने पालिका उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता, पालिका शहर व उपनगरे येथील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले जात असून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची, फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, चक्रीवादळ हे नैसर्गिक संकट असल्याने त्याला रोखणे पालिकेच्या हातात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी २४ वार्डात कंत्राटदार नेमल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे, मुंबईत पावसाळ्यात झाडे, फांद्या कोसळून दुर्घटना होऊ नये आणि कोणीही जखमी अथवा मृत्यूमुखी पडू नये यासाठी पालिका दरवर्षी तज्ज्ञमार्फत उपाययोजना करीत असल्याचे पालिका उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्यान खात्याचे प्रमुख अधिकारी जितेंद्र परदेशी हे सध्या आजारी असल्याने रजेवर आहेत. त्यांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे.

- Advertisement -

मुंबईत २९ लाख झाडे

मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे असल्याची संख्या समोर आली आहे. यामध्ये, १५ लाख ६३ हजार ७०१ झाडे ही खासगी जागेत, ११ लाख २५ हजार १८२ झाडे शासकीय जागेत, १ लाख ८५ हजार ३३३ झाडे रस्त्यालगत असून उर्वरित १ लाख १ हजार ७६ झाडे विविध उद्यानात आहेत.
पालिकेने, २ कोटी ८६ लाख रुपये खर्चून काही काळापूर्वी २ कोटी ८६ लाख रुपये खर्चण्यात आले होते.

पडलेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने वृक्षारोपण

चक्रीवादळामुळे मुंबईत तब्बल २ हजार ३६४ झाडे / फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे, फांद्या यांची पडझड होत असते. मात्र पालिका पडलेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने वृक्षारोपण करणार असल्याचा दावा पालिका उद्यान खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – पाऊस बरसला; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -