घरक्राइमDahisar Firing : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, गोळीबारानंतर हल्लेखोर मॉरिसची आत्महत्या

Dahisar Firing : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, गोळीबारानंतर हल्लेखोर मॉरिसची आत्महत्या

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राचा बिहार होत आहे की काय, असा सवाल उपस्थित व्हावा अशा घटना गेल्या काही दिवसांपासून घडताना दिसत आहेत. उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमधील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी मॉरिस याने स्वत:च्या फेसबूक लाइव्हमध्ये बोलवत अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या घातल्या आहेत. (Dahisar Firing Death of Abhishek Ghosalkar in firing suicide of attacker Morris after firing)

हेही वाचा – Aaditya Thackeray : गँगलीडर घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसले; दहिसर गोळीबार प्रकरणी ठाकरेंचे गंभीर आरोप

- Advertisement -

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज रात्री 7.45 वाजताच्या सुमारास गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्याच्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावलं होते. यावेळी अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिससोबत फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. संवाद संपल्यानंतर आधी मॉरिस फेसबूक लाइव्हमधून निघून गेला. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उठून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. फेसबुक लाइव्हमध्ये गोळ्यांचा आणि अभिषेक घोसाळकर यांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. धक्कादायक म्हणजे गोळीबार झाल्यानंतरही फेसबूक लाइव्ह पाऊणतास सुरूच होते.

हेही वाचा – NCP : खासदार अमोल कोल्हे यांचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना शपथपत्र; बाकीचे पाच आमदार कोण? जाणून घ्या…

- Advertisement -

अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

फेसबुक लाइव्हमध्ये दिसत आहे की, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यातील 3 गोळ्या अभिषेक यांना लागल्या. यानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच हल्लाखोर मॉरिसने स्वत:वरही चार गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -