घरपालघरबुलेट ट्रेनच्या विद्युतीकरणाच्या कामाचा करार निश्चित

बुलेट ट्रेनच्या विद्युतीकरणाच्या कामाचा करार निश्चित

Subscribe

कामांमध्ये जपानी शिंकानसेन सिस्टीम आधारित ट्रॅक्शन पॉवर सप्लायचा समावेश असलेल्या ताशी 320 किलोमीटर पर्यंतच्या वेगासाठी योग्य 2 x 25 किलोव्हॅट विद्युतीकरण प्रणालीची रचना, निर्मिती, पुरवठा, बांधकाम, स्थापना,चाचणी आणि कार्यान्वित करण्याची कामे समाविष्ट आहेत.

मनोर:  मुंबई -अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या विद्युतीकरणाच्या कामाच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे.नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मेसर्स सोजित्झ आणि एल अँड टी कन्सोर्टियम यांच्या सोबत ईडब्लू -1 पॅकेज अंतर्गत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विद्युतीकरणाच्या (इलेक्ट्रिकल) कामांसाठी करार करण्यात आला आहे. करारावेळी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक,वरिष्ठ अधिकारी आणि (एमएलआयटी) जपानचे भूमी, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन मंत्रालय, (जेआयसीए)जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी,जपानी दूतावास आणि जपान हाय स्पीड रेल्वे (एचएसआर) इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. बुलेट ट्रेनच्या विद्युतीकरणाच्या कामाचा करार निश्चित झाल्याने प्रकल्प आवाक्यात येण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे.जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित भारतातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे. कामांमध्ये जपानी शिंकानसेन सिस्टीम आधारित ट्रॅक्शन पॉवर सप्लायचा समावेश असलेल्या ताशी 320 किलोमीटर पर्यंतच्या वेगासाठी योग्य 2 x 25 किलोव्हॅट विद्युतीकरण प्रणालीची रचना, निर्मिती, पुरवठा, बांधकाम, स्थापना,चाचणी आणि कार्यान्वित करण्याची कामे समाविष्ट आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -