घरमुंबईवाडा भूमी अभिलेख कार्यालयाची दुरावस्था

वाडा भूमी अभिलेख कार्यालयाची दुरावस्था

Subscribe

वाडा तालुक्यातील इंच न इंच जमिनीबाबत माहिती ज्या इमारतीत साठवलेली आहे असा भूमी अभिलेख वाडा उपअधीक्षक कार्यालयाची अवस्था अतिशय दयनीय असून गळकी इमारत व मोडलेल्या खिडक्या यांमुळे येथील दस्तऐवज धोक्यात आहे.

वाडा तालुक्यातील जमिनीच्या प्रत्येक भागाचे नकाशे, हद्दी व अन्य अतिशय महत्त्वाची माहिती भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध आहे. मात्र हा महत्वाचा साठा ज्या इमारतीत सुरक्षित आहे ती जागा मात्र सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. तहसीलदार कार्यालयाच्या मागे असलेल्या या इमारतीचे छत पावसाळ्यात ठीकठिकाणी गळत असते. या इमारतीवर टाकण्यात आलेले पत्रे अनेक ठिकाणी संपुष्टात आलेले असून इमारतीच्या खिडक्या प्लायवूडने झाकून ठेवल्या आहेत तर अनेक ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत.

- Advertisement -

अतिशय बकाल अवस्थेत असलेल्या या इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे असून याबाबत 2018 सालीच दुरुस्तीबाबत मागणी केल्याचे भूमी अभिलेख अधिकारी सांगतात. सरकारी इमारतींची दुरुस्ती व नव्याने उभारणी सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असते. मात्र, प्रस्ताव देऊनही इतक्या महत्वाच्या इमारतीकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही हा गंभीर प्रश्न आहे.

त्यामुळे येत्या पावसाळ्या आधी या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.2018 साली आम्ही या इमारतीच्या दुरुस्तीबाबत मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली असून अद्याप याबाबत काहीही पाऊल उचलले गेले नाही. आम्ही पाठपुरावा करीत आहोत मात्र बांधकाम विभागाने हे गांभीर्याने घ्यायला हवे. -एस. डी. शनवार, मुख्यालय सहाय्यक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -