घरमुंबईवसईत प्राचीन सामवेदी लोकगीतांचे सूर

वसईत प्राचीन सामवेदी लोकगीतांचे सूर

Subscribe

पारंपरिक भावगीते, लग्नगीतांची मेजवानी

आधुनिकतेच्या वावटळीत सर्वत्र पारंपरिक लोकगीते नष्ट होत असताना सेंट गोन्सालो सणाच्या पार्श्वभूमीवर वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ व गास चर्च पॅरीश यांनी गास चर्च मैदान येथे रविवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या सामवेदी कुपारी गीत सरगम या कार्यक्रमात प्राचीन सामवेदी लोकगीतांचे सूर घुमले. यावेळी उपस्थित रसिकांनी ताल धरत मनमुराद दाद दिली. यावेळी ‘रमेदाये आये, आईक माजा गराना । ’ या भक्तीगीतासह ‘असंख्य भावगीते, संस्कृती लग्नगीते यांच्या पारंपरिक साजाने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला आणि हजारो उपस्थित लोक पारंपरिक लोकगीतांत अक्षरशः न्हाऊन गेले.

वसई म्हणजे संमिश्र संस्कृती व बोलीभाषांचे संमेलनच असून पुरातन काळापासून यज्ञ वा मंगलसमयी ऋचा गायन करणार्‍या सामवेदी समाजात परंपरेने चालत आलेला लोकगीतांचा खूप मोठा ठेवा येथे आहे. तो जतन करुन ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य सामवेदी ख्रिस्ती महिलांनी आजवर केलेले आहे. मात्र सामवेदी बोली भाषेतील आंतरिक गोडव्याने भरलेली ही लोकगीते आज नष्ट होण्याच्या मार्गावर असून ती वाचवण्यासाठी कुपारी संस्कृती मंडळाने पुढाकार घेतला आहे. या संचिताचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने वसईत सामवेदी कुपारी लोकगीतांचा सोहळा घडवून आणला.

- Advertisement -

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी फादर ज्यो आल्मेडा, प्रमुख अतिथी कॅथॉलिक बँकेचे उपाध्यक्ष मॅन्युअल लोपीस, विशेष निमंत्रित एलायस डायस यांचा मंचावर विशेष सन्मान करण्यात आला. वसईतील प्रसिद्ध गायिका मोनिका तुस्कानो, जेनिफर लोबो, आदींनी सादर केलेली. ‘जाई-जुईसॉ माडॉ रे..।’ ‘आले ग राती बाय…’ , ‘दुये सासर्‍या जात्या वँळे..’, ‘झोपाळ्यावर बैसू आपण.., ’ अशा सुश्राव्य लोकगीतांनी व त्या गीतांना स्ट्रिंग मेलोडीजने दिलेल्या अनुरूप पारंपरिक संगीताच्या ठेक्यावर उपस्थित सर्वांनीच अक्षरशः ताल धरला व नाच केला. यावेळी गास गावातील महिला संघाने सादर केलेल्या पारंपरिक लोकगीतांना तसेच तेजल परेरा गास गर्ल्स ग्रुपने सादर केलेल्या धमाकेदार कुपारी डान्सला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यामुळे हा कार्यक्रम रंगत गेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ अध्यक्ष जिम(फिलीप)रॉड्रीग्ज तसा संस्कृती मंडळ कार्यकर्त्यांनी व गास चर्च पॅरीश कौन्सिल सदस्यांनी मेहनत घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -