घरमुंबईठाण्यातील उपवन तलावात धोक्याच्या उड्या

ठाण्यातील उपवन तलावात धोक्याच्या उड्या

Subscribe

तलावात पोहण्यास मनाई असतानाही, स्थानिक मुले बिनधास्तपणे पोहतात. इथल्या सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नाहीत उलट त्यांनाच दमदाटी करून शिवीगाळ केली जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तलावाच्या सभोवती लोखंडी कुंपन लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणची संरक्षण कुंपन गायब झाली आहेत.

तलावांचे शहर म्हणूनच ठाण्याची ओळख आहे. पण तलावांच्या संवर्धनाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलावाभेावती असलेले लोखंडी संरक्षण कठडे गेल्या दोन वर्षापासून तुटलेले आहेत. तर अनेक ठिकाणी संरक्षण कठडेच गायब झाल्याने त्या ठिकाणी चक्क लाकडाचे बांबू लावले आहेत. पावसाळ्यात तलाव तुडूंब भरला आहे. मात्र संरक्षण कठडे नसल्याने एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी अनेकांचा जीव गमावला आहे. मात्र तरीही पालिकेने डोळयावर पट्टी बांधलीय. त्यामुळे पालिकेचा ठाणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तलावात पोहण्यास मनाई असतानाही, स्थानिक मुले बिनधास्तपणे पोहतात. इथल्या सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नाहीत उलट त्यांनाच दमदाटी करून शिवीगाळ केली जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तलावाच्या सभोवती लोखंडी कुंपन लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणची संरक्षण कुंपन गायब झाली आहेत. मात्र पालिकेच्या हुशार अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी लाकडी बांबू बांधले आहेत. तर रस्त्याला लागून असलेली अनेक संरक्षण कठडे तुटल्याने त्यांना लाकडाचा आधार देत दोरीने बांधून ठेवले आहेत. त्या तुटलेल्या संरक्षण कठड्यावर लहान मुले बसतात. तसेच उभे राहून तलावात वाकतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तसेच तुटलेल्या संरक्षण कुंपनातून इथली स्थानिक मुले तलावाच्या आत प्रवेश करतात. तलावात पोहण्यास मनाई असतानाही कोणाचीही भिती न बाळगता बिनधास्तपणे पोहत असतात. गेल्या दीड वर्षात उपवन तलावात १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांचा बुडून मृत्यू झालाय तर अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र तरीसुध्दा उपवनच्या तलावाकडे कुणाचेही लक्ष नाही. तलावाच्या सुरक्षेसाठी दोन खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. पण ते सुरक्षा रक्षक केवळ नावापुरतेच आहेत. त्यांच्याकडून अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातेा. त्यांनाच दमदाटीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना दररोज हे निमुटपणे सहन करावे लागत आहे अशी परिस्थिती आहे.

तलावाच्या संवर्धनाचा पैसा जातो कुठे ?
मागील आठवड्यात काही तलावांच्या संवर्धनासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तलावाची निगा राखण्यासाठी महापालिका प्रतिवर्षी कोटयावधी रूपये खर्च करते तरीही तलावांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही मग हा पैसा जातो कुठे ? असा सवाल ठाणेकरांमध्ये उपस्थित होतोय.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ

पावसाळ्यात जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघात होतात व पर्यटकांना जीव गमवावे लागत आहेत त्यामुळे अश्या विविध ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलाय. मात्र उपवनच्या तलावासाठी हा आदेश नाही का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाने तुडूंब भरलेल्या उपवन तलावात दररोज १५ ते २० मुले कोणाचीही भिती न बाळगता पोहत असतात. स्थानिक मुले ही १५ ते २० जण असल्याने दोघा सुरक्षा रक्षकांना जुमानत नाहीत. सुरक्षा रक्षकांनी स्थानिक पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत मात्र अजूनही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे उपवनमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे.

- Advertisement -

तलावाच्या संरक्षण कठडे तुटले असल्यास तातडीने लक्ष देऊन बांधकाम विभागाला सांगितले जाईल. पण मुलांनी तलावात उतरू नये ती त्यांचीही जबाबदारी आहे. सुरक्षा रक्षकांना जुमानत नसतील तर योग्य ती कारवाई करण्यात येईल. –
-चारुशीला पंडित, सहाय्यक आयुक्त, वर्तकनगर, ठामपा


संतोष गायकवाड। ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -