घरमुंबईजोगेंद्रची पोलिसांनी हत्या केली; नालासोपार्‍यातील एन्काऊंटर फेक असल्याची अधिक्षकांकडे तक्रार

जोगेंद्रची पोलिसांनी हत्या केली; नालासोपार्‍यातील एन्काऊंटर फेक असल्याची अधिक्षकांकडे तक्रार

Subscribe

गोविंद राणाचा नालासोपार्‍यात एन्काऊंटर झाला नसून त्याचा खून करण्यात आल्याची लेखी तक्रार त्याचा भाऊ सुरेंद्र राणा याने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यावेळी सुरेंद्रने काही छायाचित्रे लेखी तक्रारीसोबत जोडली आहेत. या छायाचित्रातून आपल्या भावाचे एन्काऊंटर फेक होते. त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याने केला आहे.

गोविंद राणाचा नालासोपार्‍यात एन्काऊंटर झाला नसून त्याचा खून करण्यात आल्याची लेखी तक्रार त्याचा भाऊ सुरेंद्र राणा याने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यावेळी सुरेंद्रने काही छायाचित्रे लेखी तक्रारीसोबत जोडली आहेत. या छायाचित्रातून आपल्या भावाचे एन्काऊंटर फेक होते. त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याने केला आहे. हिस्ट्रीशिटर गोविंद राणाचा भरदिवसा पोलिसांनी सोमवारी दुपारी एन्काऊंटर केला होता. राणाने सशस्त्र हल्ला केल्यामुळे त्याच्यावर नाईलाजाने गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे धाडसी एन्काऊंटर करणार्‍या मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ यांचे सर्वत्र कौतूक केले जात होते. मात्र,त्याचवेळी गोविंद राणाचा भाऊ सुरेंद्र राणाने हा एन्काऊंटर नसून खून झाल्याचा आरोप करीत काही छायाचित्रे पुरावे म्हणून समोर आणली आहेत.

गोविंद उर्फ जोगेंद्र याच्यावर पालघर आणि मुंबई पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर पोलिसांचे म्हणणे सुरेंद्र राणाने खोडून काढत जोगेंद्रवर कोणतेच गुन्हे नसल्याचे सांगितले. चार वर्षांपूर्वी तो छोट्यामोठ्या चोर्‍या करीत होता. या गुन्ह्यात तो तीन वर्षांची शिक्षाही भोगून आला होता. त्यानंतर तो ओला कॅबचा चालक म्हणून काम करीत होता. नालासोपार्‍यात तो आपली पत्नी महक हिच्या सोबत सर्वसामान्य नागरिक म्हणून जीवन जगत होता. सोमवारी दुपारी पत्नीला ठाण्याला जाणार्‍या बसमध्ये बसवून त्याने जवळच्या गॅरेजमध्ये आपली दुचाकी दुरुस्तीसाठी दिली. त्यानंतर तो राधानगर रोडवरून नगीनदासपाडा येथील घरी निघाला होता, त्यावेळी त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप सुरेंद्र राणा यांनी केला आहे. याबाबत लेखी तक्रार सुरेंद्रने केली पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

कोट

गोविंद घरी येत असताना अचानक धावत येत दोन पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्या छातीत जवळून गोळी झाडली. दुसरी गोळी पायावर झाडली. त्यानंतर गोळ्या झाडणार्‍या मंगेश नावाच्या पोलिसाने उभे राहून इतर पोलिसांना बोलावले. जवळच्या टेम्पोवर शांतपणे पाय ठेवून त्याने आपल्या बुटाचे लेसही बांधले. त्यावेळी त्याच्या पोटावर कोणताही वार नव्हता. हे फोटोत ठळकपणे दिसून येत आहे. जोगेंद्रचा खून केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने सोयीस्करपणे वार करून घेतले.
-सुरेंद्र राणा, गोविंद राणाचा भाऊ

- Advertisement -

तर आम्ही गोविंदला पकडल्यावर तो धक्का देवून पळाला. त्याचा पाठलाग केल्यावर अचानक थांबून त्याने आपल्या जवळील चाकू काढून वार केला. हा वार पोटाला छाटून गेला. त्यानंतर त्याने पुन्हा सपासप चाकु फिरवला. त्यामुळे स्वरक्षणासाठी त्याच्या पायावर गोळी झाडली. तरीही त्याने हल्ला थांबवला नाही. त्यामुळे पुन्हा दुसरी गोळी झाडली.त्यात तो गतप्राण झाला.
मंगेश चव्हाण, पोलीस कर्मचारी

या प्रकरणाची चौकशी करू.
-मंजुनाथ सिंगे, पोलीस अधीक्षक

 


वसई । रविंद्र माने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -