घरमुंबईसरकारी योजना घराघरांत पोहचवा

सरकारी योजना घराघरांत पोहचवा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

महाराष्ट्र विकास आघडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारकडून अनेक निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी हिताचे निर्णय घेण्यात आले असून या योजनांची लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लावले आहे. सरकारच्या या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे, अशी सूचना सोमवारी दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवन येेथे आयोजित केली होती. या बैठकीत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील आदेश दिले आहेत. या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरविंद नेरकर, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ आदी उपस्थित होते. या बैठकी अगोदर शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले.

- Advertisement -

या बैठकीबद्दल अधिक माहिती देताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, नव्या सरकारने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचे वचन पूर्ण केले. त्याबरोबरच जनतेच्या सोयीसाठी राज्यातील प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय, दहा रुपयांमध्ये शिवभोजन, विदर्भात स्टील प्रकल्प, धान उत्पादक शेतकर्यांना अनुदान, अन्नप्रक्रिया क्लस्टरची उभारणी, आशा कार्यकर्त्यांना मानधन आदी निर्णयही घेतले. या निर्णयांचा आणि योजनांचा फायदा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. त्यासाठी त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असून योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदोपत्री प्रक्रियाही पूर्ण होणे गरजेचे आहे. शेतकरी आणि जनसामान्यांना त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -