घरमुंबईउल्हासनगरमधील 'मंदार' इमारत पाडण्यास सुरवात

उल्हासनगरमधील ‘मंदार’ इमारत पाडण्यास सुरवात

Subscribe

उल्हासनगरमधील अतिधोकादायक इमारतींच्या पाडकामाला सुरवात करण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील २१४ धोकादायक तर ४१ इमारती अतिधोकादायक असल्याची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशान्वये प्रभाग समिती ४च्या हद्दित असलेली मंदार ही चार मजली अतिधोकादायक इमारत पाडण्यास आजपासून सुरवात करण्यात आली. यासोबत प्रभाग २ मध्ये असलेल्या ‘आसाराम’ या अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना इमारत रिकामी केली नाही तर वीज-पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार, अशा नोटिसा बजावण्यात आल्याची, माहिती अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली.

यंदाच्या यादीनुसार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती १ मध्ये ५६, प्रभाग समिती २ मध्ये ५२, प्रभाग समिती ३ मध्ये ७७ आणि प्रभाग समिती ४ मध्ये २९ अशा एकूण २१४ इमारती या धोकादायक आहेत. तसेच प्रभाग समिती १ मध्ये २३, प्रभाग समिती २ मध्ये १०, प्रभाग समिती ३ मध्ये ३ आणि प्रभाग समिती ४ मध्ये ५ अशा ४१ मालमत्ता, या इमारती अतिधोकादायक आहेत.

- Advertisement -

या इमारती अतिधोकादायक

अतिधोकादायक इमारतींमध्ये आसाराम अपार्टमेंट, विनय अपार्टमेंट, सत्यम अपार्टमेंट, गुलमोहर पार्क, पद्मा पॅलेस, जय अंबे अपार्टमेन्ट मधील विनय व्हिला, कैलासपती अपार्टमेंट, गजानन मार्केट, दोन शाळांचा समावेश आहे.

इमारत रिकामी करण्याविषयी रहिवाशांना नोटीस

या यादीच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, भगवान कुमावत, दत्तात्रय जाधव यांनी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. ‘आसाराम’ ही तीन मजली इमारत अतिधोकादायक झाल्याने येथील रहिवाशांना इमारत खाली करा अन्यथा पाणी आणि विज जोडणी तोडण्यात येणार अशा नोटिसा सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी बजावल्या आहेत.

उल्हासनगर मधील लालचक्की चौकात, धन्वंतरी हॉस्पिटलच्या मागे ‘मंदार अपार्टमेंट’ ही इमारत आहे. या चार मजली इमारतीत १७ कुटूंबं वास्तव्यास होते. मागच्या वर्षी ही इमारत रिकामी करण्यात आली होती. आजपासून ही इमारत पाडण्याचे काम हाती घेतले आहे. 
गणेश शिंपी, प्रमुख अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विरोधी पथक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -