घरमुंबईमोटारसायकल व मोबाईल चोरी करणारा चोरटा जेरबंद

मोटारसायकल व मोबाईल चोरी करणारा चोरटा जेरबंद

Subscribe

ठाण्यात मोटारसायकल व मोबाईल फोन चोरी करणार्‍या अट्टल चोरास कासारवडवली पोलिसांनी रविवारी (ता.६) अटक केली. त्याच्याकडून एक चोरीची मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन जप्त केला. याच्याविरुद्ध कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कासारवडली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक रविवारी पोलीस ठाण्याचे हद्दीत आनंद नगर,ज्ञानगंगा कॉलेज हावरे सिटी येथे पोलीस गस्त करीत असताना पाच आंबा हावरे सिटीकडे जाणार्‍या परिसरात एक मोटारसायकलस्वार संशयितरित्या उभा असल्याने त्याला पोलिसांनी हटकून त्याला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव सचिन विनायक मोरे (२०) रा.पाचआंबा कैलास मित्र मंडळाच्या बाजूला हावरे सिटी ठाणे असे सांगितले.

- Advertisement -

त्याच्याकडे त्याचे वाहनाबाबत कोणतेही कागदपत्र त्याने सादर केले नाही. पोलिसांना संशय आल्याने या मोटारसायकलबाबत पोलीस स्टेशनकडे अभिलेख तपासला असता हे वाहन चोरीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची पोलिसांनी अंगझडती घेतल्यावर त्याने एक मोबाईल फोन कासारवडवली मार्केटमधून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी ओरोपीला रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक चोरीची मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन जप्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -