घरमुंबईकौशल्य विकासाचा स्वतंत्र विषय राबवावा

कौशल्य विकासाचा स्वतंत्र विषय राबवावा

Subscribe

कौशल्य विकासाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास त्याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात याचा फायदाच होईल, असेही शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई : महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधीजींच्या तत्त्वावर आधारित ‘नई तालिम’ दिवसांतर्गत सर्व शाळांना विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे परिपत्रक शिक्षण आयुक्तालयाकडून काढण्यात आले आहे. परंतु विद्यार्थ्यांना फक्त गांधी जयंतीनिमित्त काही दिवस कौशल्य प्रशिक्षण देण्याऐवजी स्वतंत्र विषयच अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. कौशल्य विकासाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास त्याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात याचा फायदाच होईल, असेही शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

गांधी जयंतीनिमित्त दरवर्षी सरकार त्यांच्या शिकवणीवर आधारित विविध उपक्रम राबवण्यात येतात. गेल्यावर्षी सरकारकडून ‘स्वच्छ भारत’ अभियान राबवले तर यावर्षी शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना गांधी जयंतीनिमित्त कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे परिपत्रक काढले आहे. महात्मा गांधीच्या शिकवणीमध्ये प्रत्येक गाव व घर हे स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. ही शिकवण अंमलात आणल्यास प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंपूर्ण बनण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सरकारने दरवर्षी काही काळापुरता हा उपक्रम राबवण्याऐवजी त्याचा कायमस्वरुपी अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कमी काळामध्ये कौशल्य विकास शिकवणे फार अवघड आहे. अनेकदा मुलांना शिकवल्यानंतर काही काळ लक्षात राहते. पण नंतर ते विसरून जातात. त्यामुळे कौशल्य विकास हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास मुलांंना त्याचा नक्कीच फायदा हाईल. विद्यार्थ्यांवर असलेल्या अभ्यासाचा ताण पाहता काही विषयांमधील धडे कमी केल्यास किंवा आठवड्यातील दोन तास या विषयासाठी दिल्यास विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचा विषय स्वतंत्रपणे शिकवता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

वार्षिक नियोजन बिघडते

शालेय अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन एप्रिल व मेमध्ये ठरवण्यात येते. त्यामुळे असे उपक्रम राबवण्याबाबत अगोदर माहिती दिल्यास त्यांचे नियोजन शक्य होते. अचानक सुचवलेल्या उपक्रमामुळे नियोजन ढेपाळते. तसेच शिक्षकांनाही यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, असेही प्रशांत रेडिज यांनी सांगितले.

मराठा मोर्चा, भारत बंद, पावसाळा यामुळे बर्‍याचदा शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे बराचसा वेळ फुकट गेला आहे. त्यातच सात दिवस राबवण्यात येणार्‍या ‘नई तालिम’उपक्रमाचा परिणामही अभ्यासक्रमावर होण्याची शक्यता आहे.  – प्रशांत रेडिज, सचिव, मुंबई मुख्याध्याप संघटना

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -