घरCORONA UPDATECSRचा कायदा काँग्रेसच्या काळातला, तरीही भाजपवर टीका - फडणवीस

CSRचा कायदा काँग्रेसच्या काळातला, तरीही भाजपवर टीका – फडणवीस

Subscribe

मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा राज्यांनी स्थापन केलेल्या मदत निधीला केली जाणारी मदत ही सीएसआर फंडात ग्राह्य धरली जाणार नाही असे पत्रक निघाल्यानंतर भाजपवर विरोधक टीका करू लागले आहेत. या संकटाच्या काळात देखील राजकारण सुरू असल्याची टीका भाजपवर होत आहे. मात्र ‘सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे असल्याने ते आरोप करत असल्याची’ टीका विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणारा निधी सीएसआरमध्ये धरावा, अशी मागणी केली होती असे देखील सांगितले. मात्र काही जणांना फक्त राजकारण करायचे असल्याने असे बिनबुडाचे आरोप होत असल्याचे फडणवीस म्हणाले.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा राज्यांनी स्थापन केलेल्या मदत निधीला केली जाणारी मदत ही सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत गृहीत धरली जाणार नसल्याचे केंद्रीय मंत्रालयाने एका पत्रकात म्हटले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच स्थापन झालेल्या पीएम केअर फंडचा मात्र सीएसआर साठी समावेश करण्यात आलेला आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ७ मध्ये सीएसआर फंडाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असून, त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा राज्य निधी येत नसल्याने तो सीएसआर गृहीत धरला जाणार नाही असं या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे भाजप हे या काळात देखील राजकारण करत असल्याची टीका होत आहे. मात्र कायदा काँग्रेस सरकारच्या काळात तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -