घरदेश-विदेशपोलिसांना म्हणाला मागच्या सीटवर पत्नी बसलीये, पदर वर केला आणि...!

पोलिसांना म्हणाला मागच्या सीटवर पत्नी बसलीये, पदर वर केला आणि…!

Subscribe

पोलिसांना त्या दोघांवर संशय आल्याने गाडीवर मागच्या सीटवर साडीचा पदर डोक्यावर घेऊन बसलेल्या व्यक्तीला तो पदर पोलिसांनी काढायला लावला

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन असतानाही काही लोकं लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडण्यासाठी काहीना काही बहाने शोधत असल्याचे समोर आले आहे. जीवघेण्या कोरोनापासून आपला बचाव करण्याऐवजी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर फिरण्यासाठी काही अतिउत्साही लोकं अनेक ठिकाणी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसताय.

असा घडला प्रकार

काहीसा असाच प्रकार उत्तर प्रदेशातील कछवा येथे शनिवारी उघडकीस आला. यावेळी बाईक चालवणाऱ्याने त्याच्या मित्राला साडी परिधान करून गाडीवरून बाजारात घेऊन जात होता. लॉकडाऊन असल्याने हे दोघं रस्त्यावर गाडीने प्रवास करत असल्याने पोलिसांनी दोघांना पकडले. पोलिसांकडून दोघांची विचारपूस करण्यात आल्यावर ते दोघेही घाबरले. बाईक चालवणाऱ्याने पोलिसांनी सोडावे म्हणून त्यांच्याकडे विनंती देखील केली. मात्र पोलिसांनी घराबाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्याने आपल्या आजारी पत्नीला डॉक्टरांकडे घेऊन जात असल्याचे कारण सांगितले. परंतु पोलिसांना त्या दोघांवर संशय आल्याने गाडीवर मागच्या सीटवर साडीचा पदर डोक्यावर घेऊन बसलेल्या व्यक्तीला तो पदर पोलिसांनी काढायला लावला. मात्र पदर चेहऱ्यावरून काढला असता त्याखाली कोणी महिला नसून पुरूष होता. त्यानंतर दोघेही घाबरले आणि पोलिसांना धक्काच बसला.

- Advertisement -

गाडीवरील दोघांचे हावभाव बघता संशय आला. त्यानंतर गाडीवर पत्नी म्हणून बसलेल्या व्यक्तीला डोक्यावरील पदर काढायला लावला असता तेथील उपस्थित लोकांसह पोलिसांना देखील हासू आवरले नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी या दोघांची कानउघडणी करून नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई देखील केली आहे.


Video- ‘हा’ प्राणी शिकवतोय, कोरोनाकाळात कसे हात धुवायचे!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -